Ranveer Allahbadia Latest Update: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने इंडियाज गॉट लेटंटमध्ये केलेल्या अश्लाघ्य विधानानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. रणवीर अलाबादियासह समय रैना आणि इतर क्रिएटर्संविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलीसरणवीर अलाहाबादियाच्या घरी गेले होते. वर्सोवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी परतत असताना माध्यमांशी संवाद साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रणवीवर अलाहाबादियाने इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना आईवडिलांबद्दल अश्लील विधान केले. त्याच्या या विधानाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर समय रैना, अपूर्वा मखीजा यांच्या विधानाचेही व्हिडीओ व्हायरल झाले.
रणवीर अलाहाबादियासह समय रैना, अपूर्वा मखीजा आणि या शो मधील इतर क्रिएटर्स विरोधात तक्रार मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रणवीर अलाहाबादियाच्या घरावर पोलिसांचे लक्ष
रणवीर अलाहाबादियावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलिसांच्या वर्सोवा ठाण्यातील दोन पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. पोलिसांनी सांगितले की घराच्या परिसरातील सुरक्षेबद्दल पाहणी करण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्हाला येथील परिस्थितीची अपडेट वरिष्ठांना कळवायची असते. इकडे गस्त घालावी लागणार आहे.
रणवीर अलाबादियावर टीकेचा भडिमार
युट्यूबर असलेला रणवीर अलाहाबादिया मोटिव्हेशन पॉडकास्ट करतो. अनेक मंत्री आणि नामांकित व्यक्तीच्या मुलाखती त्याने घेतल्या आहेत. पण, या विधानामुळे त्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. तशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर आता उमटू लागल्या आहेत.
रणवीर अलाहाबादियावर आता प्रचंड टीका होऊ लागली आहे. त्याचबरोबर मुंबई, महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही त्याच्या गुन्हे दाखल झाले आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी खार येथे ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम शूट होतो, त्याची पाहणी केली होती. आता रणवीर अलाहाबादियावर काय कारवाई केली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.