'एकवेळ पिझ्झा आणि अननस चालेल पण 'हा' कॉम्बो ठरू शकतो धोकादायक', मुंबई पोलिसांची जबरदस्त जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 03:36 PM2021-03-13T15:36:14+5:302021-03-13T15:38:51+5:30
Mumbai Police : वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम तर कधी विविध महत्त्वाच्या विषयांवर मुंबई पोलीस जनजागृती करण्याचं काम करत असतात.
मुंबई - लोकांच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) हे नेहमीच तत्पर असतात. वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम तर कधी विविध महत्त्वाच्या विषयांवर मुंबई पोलीस जनजागृती करण्याचं काम करत असतात. खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका, अफवांना बळी पडू नका असं वारंवार जनतेला सांगून काळजी घेण्याचं आवाहन करत असतात. सोशल मीडियावर आपल्या हटक्या पद्धतीने ते नेहमीच नागरिकांना उत्तम संदेश देत असतात. कोरोनाच्या संकटात देखील त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे. सध्या मुंबई पोलिसांची एक हटके पोस्ट सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
'एकवेळ पिझ्झा आणि अननस चालेल पण 'हा' कॉम्बो ठरू शकतो धोकादायक' असं सांगणारी मुंबई पोलिसांची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. कोरोनाच्या या काळात सोशल मीडियावर याच पोस्टची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करताना त्यांनी अनोख्या पद्धतीने जबरदस्त जनजागृती केली आहे. पिझ्झा आणि अननस, बिर्याणी आणि वेलची, अॅवाकॅडो आणि चॉकलेट अशा लोकांना न आवडणाऱ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं आहे. तर त्यासोबतच असलेल्या एका फोटोमध्ये एका व्यक्तीच्या हनुवटीवर मास्क लावलेला एक फोटो आहे. त्यामुळेच हा कॉम्बो आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो असं म्हणत लोकांना मास्क लावण्याचा सल्ला मुंबई पोलिसांनी दिला आहे.
कोरोना काळात मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी अनेकदा लोक मास्क न लावताच घराबाहेर पडतात. तर काही वेळा तो हनुवटीवरच असतो. अशा व्यक्तींना मुंबई पोलिसांनी आपल्या हटके पोस्टमधून मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मुंबई पोलीस सातत्याने आपल्या क्रिएटिव्ह पोस्टच्या माध्यमातून जनजागृतीचं काम करत आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनामुळे देशात 1,58,446 लोकांना गमवावा लागला जीव https://t.co/NHh5eZ4ItC#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 13, 2021
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 24,882 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 24,882 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 140 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,13,33,728 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,58,446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (13 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनाचा नवा स्ट्रेन हा सर्व जुन्या स्ट्रेनपेक्षा अधिक खतरनाकhttps://t.co/vWBLPYZR2G#coronavirus#Corona#CoronaVirusUpdates#CoronaVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) March 13, 2021