'मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कुणी सिंघम नाही', नवीन जबाबदारी मिळताच IPS देवेन भारतींचे ट्विट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:43 PM2023-01-05T18:43:56+5:302023-01-05T18:45:29+5:30

राज्य सरकारने IPS देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

'Mumbai Police is a team, not Singham', IPS Deven Bharti's tweet after getting new charge | 'मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कुणी सिंघम नाही', नवीन जबाबदारी मिळताच IPS देवेन भारतींचे ट्विट...

'मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कुणी सिंघम नाही', नवीन जबाबदारी मिळताच IPS देवेन भारतींचे ट्विट...

Next

मुंबई: 1994 बॅचचे IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदाची नियुक्ती झाली आहे. सरकारने नव्यानेच हे पद काढले असून, देवेन भारती या पदावर बसणारे पहिले अधिकारी आहेत. दरम्यान, भारती यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर एक ट्विट केले, त्यांचे हेच ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट सिंघम सर्वांनाच माहित आहे. त्यात अजय देवगणने सिंघम नावाच्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला होता की, सामान्य लोक आणि प्रेक्षक चांगले काम करणाऱ्या सर्व पोलिसांना सिंघम म्हणून संबोधू लागले. माध्यमांमध्येही चांगले किंवा धाडसी काम करणाऱ्या पोलिसांना सिंघम म्हटले जाते.

मात्र मुंबई पोलिसांचे पहिले विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की, मुंबई पोलीस ही एक टीम आहे, इथे कोणताही सिंघम नाही. म्हणजे स्पेशल सीपींनी स्पष्ट केले की, प्रत्यक्षात मुंबई पोलिसांची ओळख सिंघम या नावाने नव्हे तर टीम आणि कामावरून होते. भारती यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. 

कोण आहेत देवेन भारती?
54 वर्षीय देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील आहे. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. मुंबई पोलिसांचे पहिले विशेष पोलिस आयुक्त म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा), पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हे) हे विशेष पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करतील. 

Web Title: 'Mumbai Police is a team, not Singham', IPS Deven Bharti's tweet after getting new charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.