मुंबई : रात्रंदिवस जनतेच्या सेवेत असणारे मुंबई पोलीस आता ‘आॅन ड्युटी ८ तास’च काम करतील. देवनार पोलीस ठाण्यापासून शिपाई ते सहायक उपनिरीक्षकांसाठी सुरू केलेला ‘मिशन ८ अवर्स’ हा मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात लागू केल्याची घोषणा, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केली आहे.५ मे २०१६ रोजी पडसलगीकर यांच्या पुढाकाराने देवनार पोलीस ठाण्यात ‘८ तास सेवा’ प्रयोग सुरू झाला. टप्प्याटप्प्याने प्रयोगाचा परीघ वाढविण्यात आला. गुन्ह्यांचे स्वरूप, पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ लक्षात घेऊन, शहरातील पोलीस ठाण्यांची अ, ब, क, ड श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. पडसलगीकर यांनी मुंबई पोलीस संकुल सभागृह, नायगाव येथे १५ जानेवारीला ‘मिशन ८ अवर्स’ या कार्यक्रमादरम्यान या श्रेणींबाबत माहिती दिली, तसेच ‘मिशन ८ अवर्स’ मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात लागू करण्यात आल्याची घोषणा केली.सध्या पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षकांचा ८ तास सेवेमध्ये समावेश आहे. त्यांच्यापाठोपाठ उपनिरीक्षक ते निरीक्षक अशा वरिष्ठ पदांवरील अधिकाºयांसाठी ८ तासांच्या सेवेबाबत विचार सुरू आहे.
मुंबई पोलीस आता ‘आॅन ड्युटी ८ तास’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 5:23 AM