मुंबई पालिकेला ‘ए प्लस’ दर्जा
By admin | Published: September 2, 2014 02:38 AM2014-09-02T02:38:38+5:302014-09-02T02:38:38+5:30
शिवसेना-भाजपाची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला अ+ दर्जा देण्याचा निर्णय आघाडी सरकारने आज घेतला.
Next
केंद्र, राज्याचा निधी वाढणार : सरकारी कर्मचा:यांना भत्तेवाढ, नागपूर, पुणो अ वर्ग
मुंबई : शिवसेना-भाजपाची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला अ+ दर्जा देण्याचा निर्णय आघाडी सरकारने आज घेतला. नागपूर आणि पुणो या महापालिकांना अ वर्ग देण्यात आला आहे. मुंबईला आतार्पयत अ दर्जा तर नागपूर, पुण्याला ब दर्जा होता. राज्यातील 26 महापालिकांचे 2क्11च्या लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले आहे.
लोकसंख्या, दरडोई उत्पन्न आणि दरडोई क्षेत्रफळ या निकषांवर ही वर्गवारी करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेची लोकसंख्या अ वर्ग महापालिकेच्या प्रस्तावित निकषांच्या जवळपास आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असलेला दरडोई उत्पन्नाचा निकष ही महापालिका पूर्ण करत नाही. मात्र, नागपूरला राज्याच्या उपराजधानीचा दर्जा आहे, ही बाब विचारात घेऊन नागपूर महापालिकेला अ वर्ग देण्यात आला आहे. नाशिक महापालिकेची लोकसंख्या ब वर्ग महापालिकेच्या प्रस्तावित निकषांच्या जवळपास असल्यामुळे आणि ही महापालिका ब वर्ग महापालिकेसाठी आवश्यक असलेला दरडोई उत्पन्नाचा निकष पूर्ण करीत असल्यामुळे विशेष बाब म्हणून नाशिक महापालिकेला ब वर्ग देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पी.एम. महाजन हे औरंगाबाद महापालिकेचे नवीन आयुक्त असतील. याआधी ते धुळ्याचे जिल्हाधिकारी होते. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांची बदली मेडा; पुणो संचालकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हर्षदीप कांबळे हे सुधार प्रन्यासचे नवे सभापती असतील.
ठाण्याला ब तर वसई, डोंबिवली, नवी मुंबई क
मुंबई अ+. नागपूर, पुणो - अ वर्ग, पिंपरी-चिंचवड, ठाणो, नाशिक - ब वर्ग, कल्याण- डोंबिवली, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई क वर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली - मीरज - कुपवाड, अमरावती, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, अहमदनगर, अकोला, जळगाव, नांदेड-वाघाळा, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी - ड वर्ग.
च् दर्जा वाढलेल्या महापालिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळणा:या निधीमध्ये वाढ होणार.
च्राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचा:यांचे घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता वाढणार.
च्अ वर्ग महापालिकांना आयएएस दर्जाचे तीन अतिरिक्त आयुक्त मिळतील. आयुक्त हे सचिव वा त्यावरील दर्जाचे अधिकारी असतील.
च्अ वर्ग महापालिका झाल्याने नागपूर आणि पुणो येथील महापौरांच्या गाडीवर अधिकृतपणो लाल दिवा लावता येईल.