कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:45 PM2020-09-11T12:45:17+5:302020-09-11T12:48:58+5:30
कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे.
मुंबई - सुशांत सिंहा राजपूत आत्महत्या प्रकरण आणि अंमली पदार्थांवरून राज्य सरकार, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या आणि मुंबईची तुलना पीओकेशी करणाऱ्या कंगना राणौतच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. आधी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने कंगनाविरोधातील ड्रग्स केसचा तपास करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे सोपवली आहे. मुंबई पोलिसांना याबाबातच्या तपासासाठा महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणौतविरोधात ड्रग्सचा मुद्दा उपस्थित केला होता. कंगनाचा माजी प्रियकर अध्ययन सुमन याच्या मुलाखतीच्या आधारावर हा मुद्दा अनिल देशमुख यांनी ऐरणीवर आणला होता. त्या मुलाखमतीमध्ये अध्ययन सुमनने कंगना ड्रग्स घेत असल्याचा दावा केला होता.
कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन
अभिनेत्री कंगना रनौत हिने गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे, अशा शब्दांत कंगनाने शाब्दिक फटकारे लगावले. मात्र त्याला शिवसेनेकडून तिला काहीच प्रत्युत्तर देण्यात आले नाही. तर दुसरीकडे, कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात समर्थन केले. न्यायालयाने पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली.
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनाला भारी पडणार; विक्रोळीत तक्रार दाखल
कंगनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणं महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली.
दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार
अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई महापालिकेने ऑफिस तोडल्य़ानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही या वादात ओढले आहे. तसेच आता महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याचे तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे. आज तकने सिद्दीकी यांची मुलाखत घेतली आहे.