कंगना रनौत अश्लील ई-मेल प्रकरणी मुंबई पोलिसांनी हृतिक रोशनचा जबाब नोंदविला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 06:26 AM2021-02-28T06:26:55+5:302021-02-28T06:27:02+5:30
हृतिक रोशन याच्या तक्रारीवरून सायबर सेलने रोशनचा लॅपटॉप आणि फोनही तपासासाठी घेतला होता. तसेच कंगनाने केलेले आरोप फेटाळून लावले होते. तिच्याशी कसलेही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याचा शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने जबाब नोंदविला. त्यानिमित्ताने त्याने सुमारे तीन तास क्रॉफर्ड मार्केट येथील मुख्यालयात हजेरी लावली होती.
वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौत हिला आपला बोगस मेल आयडी वापरुन कोणीतरी अश्लील ई-मेल पाठवत असल्याची तक्रार त्याने चार वर्षांपूर्वी केली होती. त्याबाबतचा तपास पूर्ण करण्याबाबत त्याच्या वकिलांनी महिनाभरापूर्वी मुंबई
पोलीस आयुक्तांकडे मागणी केली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषण शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) केलेल्या तपासात कंगना रनौतकडून हृतिकला
अश्लील मेल पाठविल्याचे स्पष्ट झाले होते.
याबाबत त्याचा सविस्तर जबाब नोंदविण्यासाठी शनिवारी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार दुपारी पावणे बाराच्या सुमारास तो आयुक्तालयात आला.
गुप्तवार्ता विभागाने त्याचा सविस्तर जबाब नोंदविला. त्याच्यासोबत त्याचे वकील व खासगी अंगरक्षकही उपस्थित होते. सुमारे तीन तास त्याचा जबाब नोंदविण्यात आला. पावणे तीनच्या सुमारास तो आयुक्तलयातून बाहेर पडला. त्यावेळी माध्यमाशी काहीही बोलण्यास नकार दिला.
हृतिक रोशन याच्या तक्रारीवरून सायबर सेलने रोशनचा लॅपटॉप आणि फोनही तपासासाठी घेतला होता. तसेच कंगनाने केलेले आरोप फेटाळून लावले होते. तिच्याशी कसलेही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.
२०१६ मध्ये हृतिकने बनावट इ मेल प्रकरणी सायबर पाेलिसांकडे तक्रार केली हाेती. उिसेंबरमध्ये हे प्रकरण सायबर पाेलिसांकडून गुन्हा अन्वेषण शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने वर्ग करण्यात आले हाेते. त्यानुसार, गुप्तवार्ता विभागाने जबाब
नाेंदवण्यासाठी त्याला नाेटीस बजावली हाेती.