मुंबई पोलीस म्हणतात, हे आकडे धक्कादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:11 AM2021-09-02T04:11:03+5:302021-09-02T04:11:03+5:30
मुंबई : कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर पोलिसांकड़ूनही धडक कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईचा आकडा वाढत ...
मुंबई : कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर पोलिसांकड़ूनही धडक कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईचा आकडा वाढत असल्यामुळे मुंबई पोलिसांनी ट्वीट करत ‘मुंबईकरांनो, हे आकडे धक्कादायक’ असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२० ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ११ हजार ७४२ गुन्हे नोंद केले आहे. त्यानंतर यावर्षीच्या २० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या कारवाईत दंड वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली.
पोलिसांकडून गर्दीची ठिकाणे, बाजार, पर्यटन स्थळ, रेल्वे, बसस्थानक तसेच रहिवासी इमारतींबरोबर झोपडपट्टी भागात विनामास्क फिरणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. यात त्यांच्याकडून पालिकेच्या पावती पुस्तकावर २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. २० फेब्रुवारीपासून मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरू केले. यात आतापर्यंत २ लाखांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दंडाची अर्धी रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात येत आहे.
मुखपट्टी वापरण्याचे आवाहन
मुंबई पोलिसांनी गेल्या आठवडाभरातील कारवाईचा आलेख ट्वीट करत मुंबईकरांंना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये २३ ऑगस्ट रोजी दिवसभरात ४८१ वर असलेला कारवाईचा आकडा २९ ऑगस्ट रोजी ९२० वर पोहोचला. ही आकडेवारी दाखवत 'या आलेखा'ची दिशा आपणच बदलू शकता. कृपया मास्कचा वापर करा. आपल्याला शिक्षा व दंड करताना आम्हालाही आनंद होत नाही, असे त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
...
आठवडाभरातील कारवाई
२३ - ४८१
२४ - ३३९
२५ - ३९३
२६ - ४९८
२७ - ३४५
२८ - ४९४
२९ - ९२०