फेरारी, पॉर्शे, ऑडी, लेंबॉर्गिनी.... मुंबई पोलिसांनी जप्त केल्या होत्या 'सुपर कार'; हायकोर्टाने दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 09:38 PM2024-02-01T21:38:08+5:302024-02-01T21:39:19+5:30
मुंबई पोलिसांनी २६ जानेवारी रोजी आलिशान कारवर कारवाई केली.
मुंबई- मुंबई पोलिसांनी २६ जानेवारी या दिवशी ४१ आलिशान गाड्यांवर कारवाई करत जप्त केल्या. या गाड्या २६ जानेवारी रोजी रॅलीत सहभागी होणार होत्या. पण, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. आता गाड्या मालकांना दंड भरावा लागणार आहे. फेरारी, पोर्शेस, ऑडी, बीएमडब्लू, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी आणि जग्वार या ब्रॅन्डच्या या गाड्या आहेत. तसेच या गाड्यांसह एकूण ४१ गाड्या आहेत. या गाड्या मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमधून जप्त केल्या आहेत. २६ जानेवारी रोजी मुंबईत मनाई आदेश लागू केला होता या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई केली होती. याबाबत आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या गाड्या सोडण्याचे आदेश बीकेसी पोलिसांना दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांना २६ जानेवारी रोजी सकाळी जप्त केलेल्या स्पोर्ट्स कार सोडण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने पोलिसांना गाड्या सोडण्याचे आदेश दिले, पोलिसांच्या कारवाईला पुरेसा कायदेशीर आधार नसल्याचा निर्णय दिला.
सचिनने घेतली 'तेंडुलकर'ची भेट! मास्टर ब्लास्टरनं शेअर केला भावनिक Video
मिळालेली माहिती अशी, मनाई आदेश असतानाही आलिशान गाड्यांची रॅली काढली. मालकावर रॅली काढण्याची परवानगी न घेतल्याबद्दल कारवाई केली आहे. आता वाहनधारकांना त्यांचे वाहन घेण्यासाठी न्यायालयाकडून दंड भरून परवानगी घ्यावी लागणार आहे. बीएमडब्ल्यू, पोर्श, फेरारी, ऑडी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी, मॅक्लेरेन आणि जग्वार या ४१ हाय-एंड लक्झरी कार बीकेसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी रॅली काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या गाड्या जप्त केल्या होत्या.
४४ कार मालकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.