- मनीषा म्हात्रे मुंबई : बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे वाढत्या सोशल विस्तारात सायबर गुन्ह्यांत गुरफटत चाललेली तरुणाई, या सोशलवेड्या तरुणाईचा दहशतवादी कृत्यांसाठी वापर होण्याच्या शक्यतेतून याला वेळोवेळी आवर घालणे हे पोलिसांसमोर आव्हान बनले. तरुणाईला त्यांच्याच भाषेत समजावले की, लवकरच समजते असे म्हणले जाते. त्यामुळे मुंबई पोलीसही या नवनवीन तंत्रज्ञानाशी जोडली गेले. अद्ययावत संकेतस्थळ (वेबसाइट), अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून सर्व सोशल हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यापाठोपाठ मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटनेही या अद्ययावत यंत्रणेत कात टाकली. गेल्या ४ वर्षांत मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर हँडलवर ४८ लाख फॉलोवर्स जोडले गेले. विविध यंत्रणांमध्ये मुंबईकरांची टिवटिव थेट टिष्ट्वटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांच्या अकाउंटवर आली. त्यांच्यात एक संवादाचे नवे माध्यम तयार झाले.मुंबई पोलिसांसह पोलीस आयुक्तांच्या अकाउंटनेही ३३ लाख फॉलोवर्सचा टप्पा पार पाडला. मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटरची कीर्ती परदेशात अडकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचली. टिष्ट्वटरवरील मुंबई पोलिसांची भूमिका, त्यांचा प्रतिसाद यामुळे तरुणाईचा पोलिसांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलत चालल्याचे दिसून येत आहे, तर काहींना घरबसल्या आॅनलाइन पोलीस ठाणेच उपलब्ध झाल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये आहे.२६ डिसेंबरला पोलिसांच्या टिष्ट्वटर हँडलला ४ वर्षे पूर्ण झाली. यात २६ डिसेंबरपर्यंत ३० हजार ६४३ तक्रारींची टिवटिव मुंबई पोलिसांनी काही मिनिटांत दूर केली. तीन शिफ्टमध्ये येथील प्रतिनिधींचे कामकाज चालते. येथील टीम आॅनड्युटी २४ तास असते. कुठल्याही टिष्ट्वटला अवघ्या काही सेकंदात प्रतिसाद मिळतो. यात वाहतूक समस्या, ध्वनिप्रदूषण, छेडछाडीच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील तक्रारींचे थेट संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांच्या माध्यमातून निवारण करण्यात येते.पोलीस उपायुक्त (अभियान) प्रणय अशोक, निरीक्षक कुमुद कदम यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मीकांत धोंडगे, समीर साळवे, दीक्षा मोरे, जितेंद्र राक्षे आणि वाहतूक विभागाचे मुंजाभाऊ गिराम यांच्यासह २३ जणांची टीम संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून असते. यामुळे पोलीस आणि नागरिकांमधला संवाद वाढला आहे.अशी चालते यंत्रणा...मुंबई पोलिसांची वेबटीम यावर तीन शिफ्टमध्ये लक्ष ठेवते. मुंबई पोलीस अथवा पोलीस आयुक्तांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर एखादे टिष्ट्वट आले की, सुरुवातीला त्याचे स्नॅपशॉट काढले जातात. टिष्ट्वटचे गांभीर्य लक्षात घेताच, याची माहिती वेब सेंटर हेडकडे दिली जाते. अवघ्या १४० शब्दांमध्ये त्यांची माहिती समजून त्यांना उत्तर देणे शक्य नसते. अशा वेळी सुरुवातीला त्या व्यक्तीचा पर्सनल क्रमांक मिळविला जातो. त्यानंतर, त्या व्यक्तीशी संपर्क साधून संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासोबत संवाद साधला जातो. अनेकदा टिष्ट्वट्स करणारे स्वत:ची माहिती देण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविणे या टीमसमोर आवाहन असते. त्यांची तक्रार समजून संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर आलेल्या टिष्ट्वट्सवर उत्तर दिले जाते. यापैकी बºयाचशा टिष्ट्वट्सची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली जाते, तर अनेकदा पोलीस आयुक्तांचे अकाउंट ते स्वत: हाताळतात. त्यांच्याकडे आलेल्या टिष्ट्वट्सची माहिती आम्ही घेतो. त्याची शहानिशा करून त्यांना याबाबत कळविले जाते. त्यानंतर, तेच यावर उत्तर देतात किंवा अनेकदा त्यांच्या आदेशाने येथील प्रतिनिधी त्यावर प्रतिसाद देतात.
मुंबईकरांचे ‘टिष्ट्वटर’ पोलीस ठाणे; लाख मोलाचे ‘टिष्ट्वट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:58 AM