'झिंग झिंग झिंगाट' झालेल्या 455 तळीरामांविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:33 PM2019-01-01T15:33:08+5:302019-01-01T15:58:12+5:30
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अनेकांनी हॉटेल, गच्ची, रेस्टॉरंट, फार्म हाऊसवर स्वतःच्या स्टाईलनं न्यू ईअर सेलिब्रेशन करत धिंगाणा घातला.
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अनेकांनी हॉटेल, गच्ची, रेस्टॉरंट, फार्म हाऊसवर स्वतःच्या स्टाईलनं न्यू ईअर सेलिब्रेशन करत धिंगाणा घातला. दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तळीरामांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन वाहनं चालवणाऱ्या 455 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, सकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 455 वाहन चालकांना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना पकडण्यात आले आहे. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत वाहनं चालवण्यामुळे चालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून या तळीरामांकडून दंड आकारण्यात आला आणि त्यांचा वाहनचालक परवानादेखील जप्त करण्यात आला.
न्यू ईअर सेलिब्रेशनदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2018च्या मध्यरात्रीपर्यंत 1,533 वाहन चालकांना पकडण्यात आले. यातील 76 जण मद्यधुंद अवस्थेत होते.
(मुंबई पोलिसातील 'बजरंगी भाईजान', बेपत्ता मुलीला 8 दिवसांत शोधून काढलं!)
455 drunk driving challans and 1114 challans for speeding were issued in #Mumbai from 31st December 2018 till 6 am today.
— ANI (@ANI) January 1, 2019
सकाळी 6 वाजेपर्यंतची कारवाई
1. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं
9800 जणांची करण्यात आली चौकशी
यातील 455 जणांचे परवाने जप्त
2. बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या तक्रारी - 1,114
3. अन्य केसेस - 9,121
(...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज)
Just to be clear, drunk drivers are not welcome here! #DontDrinkAndDrive#NewYearsEve#NewYearsResolutionpic.twitter.com/hGkfJUqvgt
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 31, 2018
दारू पिऊन वाहन चालवल्यास परवाना 6 महिन्यांसाठी होणार रद्द
दरम्यान,दारू पिऊन वाहन चालवल्यास सहा महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करण्याचा निर्णय सोमवारी(31 डिसेंबर 2018) राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय, विमा नसलेल्या वाहनाची तात्पुरती जप्ती, ओव्हरलोड माल वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली. अनेक अपघात हे वाहनचालक नशेत असल्यामुळे होत असल्याचे विविध अहवालांतून उघड झाले आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी मागील दोन महिन्यांत 12 हजार वाहनचालकांवर कारवाई केली. यातील बहुतांश कारवाया या दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. विमा नसलेल्या वाहनाला अपघात झाल्यास जखमी किंवा मृतास कोणत्याही प्रकारचे विमा लाभ मिळत नाही. यामुळे विमा नसलेल्या वाहनांवर जागेवरच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.