मुंबई : मुंबई पोलिसांची निवासस्थाने दुरवस्थेत असल्याची राज्य सरकारला कल्पना आहे. त्यांना सर्वसोयीनियुक्त हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, येत्या काही काळात एकही पोलीस या सुविधेपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.क्रॉफर्ड मार्केट येथील मुंबई पोलीस आयुक्तालाच्या आवारात बांधण्यात आलेल्या नवीन सहा मजली वास्तूचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रंसगी ते बोलत होते. मुंबई पोलिसांना देण्यात आलेली घरे ही इंग्रजांच्या काळापासून आहेत. त्यातील बऱ्याचशा इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सोयीसुविधांनी युक्त घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या, आर्थिक मदत आणि वाढीव एफएसआय देण्यास राज्य सरकार तयार आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘पोलीस दलात आवश्यक असलेल्या मनुष्यबळाबरोबरीने आधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येणार असून, यापुढे नागरिकांना १७ सेवा आॅनलाइन (सीसीटीएन) देण्याचा प्रयत्न आहे. तसेच येत्या आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचा अंतिम टप्पा पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. ६५ कोटी खर्च!गेली चार वर्षे हे काम चालले. इमारतीच्या बांधकामासाठी ६५ कोटी रुपये खर्च आला असून आधुनिक सोईसुविधांनी परिपूर्ण असल्याचे पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळाचे महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.वरळीत नवी इमारतनवीन इमारत पोलीस व नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असे आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, ग्रामीण गृह राज्यमंत्री राम शिंदे, खा. अरविंद सावंत, आ. राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव गृह के.पी. बक्षी, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आदी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी वरळी येथे पोलिसांसाठी उभारलेल्या इमारतीचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. १३६ सदनिकांपैकी १०८ सदनिका कर्मचाऱ्यांसाठी व २८ सदनिका अधिकाऱ्यांसाठी आहेत. मुख्यमंत्र्यांचा पत्रकारांना गुंगाराशीना बोरा हत्याकांड तपास प्रकरणी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, कॉम्रेड पानसरे हत्याकांड आदीसह राज्यातील कायदा व सुव्यस्थेबाबतच्या अनेक प्रश्नांबाबत गृह विभागाची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मते जाणून घेण्यासाठी पत्रकार त्यांना भेटण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र फडणवीस यांनी त्यांना भेटणे टाळले. अशी आहे नव्या कार्यालयाची रचना तळमजल्यावर : नागरी सुविधा केंद्र, कॅन्टीन आणि पोलिसांसाठी सुसज्ज व्यायामशाळा.पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर : आयुक्तालयाचे विविध प्रशासकीय विभागतिसऱ्या व चौथ्या मजल्यावर : गुन्हे शाखेची विविध कार्यालये व कक्षपाचव्या मजल्यावर : मुख्य नियंत्रण कक्ष आणि संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही कमांडिंग सिस्टीमसहाव्या मजल्यावर : सहपोलीस आयुक्त (प्रशासन) यांच्या देखरेखीखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांसाठी कक्ष व एक मोठे सभागृह
‘मुंबई पोलिसांना मिळेल हक्काचे घर’
By admin | Published: December 29, 2015 2:12 AM