Video : मुंबई पोलीस जिंदाबाद... अन् पश्चिम बंगालच्या मजुरांनी जोरजोरात केली घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 01:27 PM2020-06-02T13:27:26+5:302020-06-02T13:41:57+5:30
मुंबईतून पश्चिम बंगाला जाणारी शेवटची ट्रेन रेल्वे स्थानकावरुन सुटली होती, पण स्थानकावर अजूनही प्रवासी पाठीमागे राहिले होते. आपल्या बॅगा घेऊन हे प्रवासी रेल्वे स्थानकावर धावत होते.
मुंबई - कोरोना लॉकडाऊन काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांच्या मदतीसाठी लाखो हात पुढे आले आहेत. राज्य सरकारने पुढाकार घेत स्पेशल श्रमिक ट्रेन सुरु केल्या. या श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले. मजुरांच्या मदतीसाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आणि पोलीस यंत्रणांनी मोठं काम केलंय. मुंबईत पोलीस दलातील पोलिसांनी आपला कर्तव्य बजावत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान दिलंय. म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई रेल्वे स्थानकावरील एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस जिंदाबादची घोषणाबाजी ऐकायला मिळते.
मुंबईतून पश्चिम बंगाला जाणारी शेवटची ट्रेन रेल्वे स्थानकावरुन सुटली होती, पण स्थानकावर अजूनही प्रवासी पाठीमागे राहिले होते. आपल्या बॅगा घेऊन हे प्रवासी रेल्वे स्थानकावर धावत होते. त्यावेळी, मुंबई पोलिसांनी धावत जाऊन रेल्वे थांबविण्याची विनंती रेल्व विभागाकडे केली. त्यानंतर, काही क्षणातच रेल्वे जागेवरच थांबली. त्यामुळे, पाठीमागे राहिलेल्या प्रवाशांना पुन्हा रेल्वेत जाता आले. यावेळी, स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवी बांधवही या मजुरांच्या मदतीला त्यांचं सामान घेऊन रेल्वे स्थानकावर धावले. अखेर, रेल्वे प्रवासी रेल्वेत बसल्यानंतरच ती रेल्वे पुन्हा पश्चिम बंगालच्या दिशेन धावत निघाली. त्यावेळी, प्रवाशी मजुरांनी मुंबई पोलीस जिंदाबाद... मुंबई पोलीस जिंदाबाद... च्या घोषणा दिल्या. तसेच, स्वयंसेवकांनीही मुंबई पोलिसांचे आभार मानत जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
.@MumbaiPolice जिंदाबाद।। https://t.co/IwNkcp1hzL
— Dayanand Kamble (@dayakamPR) June 1, 2020
खाना चाहिए फाऊंडेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर, दिल्लीतील माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे उपसंचालक दयानंद गायकवाड यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलीस जिंदाबाद म्हटलं आहे.