मुंबई पोलिसांची 'गलती से मिस्टेक', महाराष्ट्र पोलीस अजून झाले नाहीत 'हायटेक'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 06:22 PM2018-07-02T18:22:00+5:302018-07-02T18:42:00+5:30

मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर फोटो माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांचा आणि नाव नवनिर्वाचित आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांचे

Mumbai police's 'mistake mistakenly', Maharashtra Police has not yet become 'hitek' | मुंबई पोलिसांची 'गलती से मिस्टेक', महाराष्ट्र पोलीस अजून झाले नाहीत 'हायटेक'

मुंबई पोलिसांची 'गलती से मिस्टेक', महाराष्ट्र पोलीस अजून झाले नाहीत 'हायटेक'

Next

मुंबई - महाराष्ट्र राज्य पोलीस आणि मुंबई पोलीस दल आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे बोलबाला केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तसं खरंच आहे का? असा प्रश्न पडतो, जेव्हा आपण महाराष्ट्र राज्य पोलीस आणि मुंबई पोलिस दलाचे संकेतस्थळ पाहतो. ३० जूनला पोलीस महासंचालक सतीश माथुर सेवानिवृत्त झाले आणि त्यापदी दत्ता पडसलगीकर रुजू झाले. मात्र, अद्याप महाराष्ट्र्र राज्य पोलीस दलाच्या http://mahapolice.gov.in/ या संकेतस्थळावर अजूनही सतीश माथुर यांचे नाव आणि छायाचित्र आहेत. तर कहर म्हणजे मुंबई पोलिसांच्या https://mumbaipolice.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर नव्या पोलीस आयुक्तांचे आणि छायाचित्र दत्ता पडसलगीकर यांचा आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या गप्पा मारणारी आपली हि सुरक्षा दलं नक्की तांत्रिकदृष्ट्याआधुनिक आहेत का? असा सवाल निर्माण होतो.  

नुकतीच  मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्याच्या वापरातून पोलीस दलाने आपली कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवावी. त्याचबरोबर पोलिसांनी स्वतःमधील संवेदनशीलता जागृत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, हे केवळ बोलाचे घेवडे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकतेच मुंबई पोलीस दलाच्यावतीने डायल १०० च्या अत्याधुनिक यंत्रणेचे तसेच विविध उपक्रमांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा (एमपीआयएस), ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, एम पासपोर्ट, संवाद ॲप्स, ट्विटर हँडल, मोबाईल सर्व्हेलन्स वाहने आदी उपक्रमांचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, हि यंत्रणा सक्षम असण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची भूमिका पार पडणारी हवी. अनेक मुंबईकर मुंबई पोलिसांची https://mumbaipolice.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट देतात आणि उपलब्ध माहितीचा विनियोग करतात. परंतु, मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती अपडेट नसल्यास त्यांची गैरसोय होऊ शकते. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांचे संपर्क क्रमांक व इतर माहिती उपलब्ध आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली किंवा पदोन्नती झाल्याने बऱ्याच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बदलले आहेत. मात्र, अद्याप हा बदल संकेतस्थळावर करण्यात आलेला नाही. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर तर फोटो माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांचा आणि नाव नवनिर्वाचित आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांचे आहे. हि घोडचूक मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे. तर, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संकेस्थळावर अद्याप बदलच केलेला नाही. 

Web Title: Mumbai police's 'mistake mistakenly', Maharashtra Police has not yet become 'hitek'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.