तरुणीच्या टि्वटला मुंबई पोलिसांचा ‘क्विक रीस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:13 AM2017-08-18T06:13:33+5:302017-08-18T06:13:35+5:30

डीजे वर्णिका कुंडू यांचा पाठलाग करणा-यांच्या काही तासांतच मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Mumbai Police's 'Quick Response' | तरुणीच्या टि्वटला मुंबई पोलिसांचा ‘क्विक रीस्पॉन्स’

तरुणीच्या टि्वटला मुंबई पोलिसांचा ‘क्विक रीस्पॉन्स’

googlenewsNext

मुंबई : डीजे वर्णिका कुंडू यांचा पाठलाग करणाºयांच्या काही तासांतच मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्या दोन आठवड्यांनंतर पुन्हा अंधेरी परिसरात एका तरुणीचा अशाच प्रकारे पाठलाग करण्यात आला. मात्र तिने हा प्रकार टिष्ट्वट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिच्या मागावर असलेले दुचाकीस्वार पसार झाले. त्यामुळे आता कामावरून उशिरा परतणाºया महिलांना घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण त्या मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया या तरुणीने ट्विटरवर दिली आहे.
असीरा तरन्नुम (२५) असे या तरुणीचे नाव आहे. ती मीडिया प्रोफेशनमध्ये असून, बुधवारी रात्री १च्या सुमारास अंधेरी परिसरातून रिक्षाने घरी परतत होती. ती रिक्षात बसण्याआधीच दोघे दुचाकीवरून तिचा पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. ते दोघे तिचा पाठलाग करत तिच्याकडे बघून अश्लील शेरेबाजी करत होते. तेव्हा आपल्या मैत्रिणीला फोन करून मदत मागण्याचे तिने ठरविले. मात्र त्यापूर्वी हिंमत करून तिने त्या दोघांचा फोटो काढून मुंबई पोलिसांना टिष्ट्वट केले.
अगदी काही सेकंदांतच पोलीस नियंत्रण कक्षातील कांचन गतखाने या महिला पोलिसाने असीराला फोन केला. तेव्हा तिने सगळा प्रकार कांचन यांना सांगितला. तिचे नेमके लोकेशन विचारून तिला रिक्षा जुहूच्या दिशेने नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार असीराने रिक्षा वळवली. त्याच रस्त्यावर तिला काही पोलीस कर्मचारी दिसले. त्यांना पाहिल्यावर पाठलाग करणारे भामटे पळून गेले. त्यानंतर ती घरी पोहोचल्यानंतरदेखील ती नीट घरी पोहोचली की नाही हेदेखील पोलिसांनी पुन्हा फोन करून तिला विचारले. पोलिसांच्या त्या ‘क्विक रीस्पॉन्स’नंतर महिला मुंबई पोलिसांच्या सुरक्षा कवचात सुरक्षित आहेत, अशी प्रतिक्रिया टिष्ट्वटरद्वारे असीराने दिली. सध्या मुंबई पोलीस या दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत.
>दुचाकीस्वारांचा शोध सुरू
तरुणीने हिंमत करून दुचाकीवरून पाठलाग करणाºया दोघांचे फोटो काढले. त्यानतंर मुंबई पोलिसांना टिष्ट्वट केले. अगदी काही सेकंदांतच पोलीस नियंत्रण कक्षातील कांचन गतखाने या महिला पोलिसाने तरुणीला फोन केला. तरुणीच्या मदतीला पोलीस येताच दुचाकीस्वारांनी पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Mumbai Police's 'Quick Response'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.