विद्यार्थी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांची निंयमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 04:39 AM2017-09-14T04:39:55+5:302017-09-14T04:40:15+5:30

गुरुग्रामच्या घटनेनंतर, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत. ‘पोलीस दीदी उपक्रमा’बरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. यासाठी पोलीस उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.

 Mumbai Police's Rules for Student Safety | विद्यार्थी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांची निंयमावली

विद्यार्थी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांची निंयमावली

Next

 मुंबई : गुरुग्रामच्या घटनेनंतर, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत. ‘पोलीस दीदी उपक्रमा’बरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. यासाठी पोलीस उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात ही नवी नियमावली मुंबईतील सर्व शाळांना जारी करण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी दिली.
हरयाणाच्या गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये, ७ वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूरची बस कंडक्टरने हत्या केली. मुंबईत अशा घटना घडू नयेत, म्हणून मुंबई पोलिसांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या नियमात बदल करून नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. शाळा, पालक, शिक्षक सर्वांना यात सामावून घेण्यात येणार आहे.

Web Title:  Mumbai Police's Rules for Student Safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.