Join us

Mumbai: राजकारण, पाऊस : अंदाज खोटे कसे ठरतात?

By अतुल कुलकर्णी | Published: June 26, 2023 1:59 PM

Mumbai: मुंबईत पहिल्याच पावसाने महापालिकेचे सगळे दावे, अंदाजदेखील सपशेल खोटे ठरले. सगळ्यांचेच अंदाज, दावे असे खोटे कसे ठरतात?

- अतुल कुलकर्णी(संपादक, मुंबई)लहानपणी एक गोष्ट सांगितली ल जायची. गावात खूप दुष्काळ पडलेला असतो. गावाचा प्रमुख महादेवाला साकडे घालतो. प्रत्येकाने आपल्या घरून जेवढे जमेल तेवढे दूध घेऊन यावे आणि महादेवाच्या मंदिरात टाकावे. महादेवाचा गाभारा दुधाने भरून टाकू, असे ते साकडे घातले जाते. पाऊस सगळ्यांनाच हवा असतो. प्रत्येक जण ज्याला जेवढे जमेल, तेवढे दूध मंदिरात घेऊन जातो. संध्याकाळपर्यंत सगळे गावकरी मंदिरात येऊन जातात, गाभारा उघडण्याची तयारी होते. तेवढ्यात एक म्हातारी काठी टेकत सुरू ह टेकत वाटीभर दूध घेऊन येते. गावातले लोक हाडामासाच्या माणसांचीच असते. म्हणतात सगळ्यांनी दूध टाकले आहे. तुझ्या नीतीमूल्यांचा आणि सामाजिक जाणिवांचा वाटीभर दुधाने काय होणार म्हातारे. म्हातारी दुधाची वाटी घेऊन मंदिरात पायऱ्यावर उभी राहते. गाभारा उघडला जातो. आत सगळीकडे पाणी असते. प्रत्येकाला वाटते दुसरा कोणीतरी दूध टाकणारच आहे, मी पाणी टाकले तर बिघडले कुठे..? त्यामुळे कोणीच दूध टाकत नाही आणि गाभारा पाण्यानेच भरून जातो...

ही कथा आज प्रकर्षाने आठवली, त्याचे कारणही तसेच आहे. हवामान खात्याने १ जून ते २३ जून या कालावधीत दिलेले पाचही अंदाज खोटे ठरले. ज्या दिवशी पाऊस येणार, असे हवामान खात्याने सांगितले त्या दिवशी सगळीकडे ऊन पडले. अखेर तारखेला पावसाने हजेरी लावली. मुंबईत पहिल्याच दिवशी शंभर मिलीमीटर पाऊस झाला आणि या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या प्रशासनाने केलेले सगळे दावे, अंदाजदेखील असे खोटे कसे ठरतात? सरकारमध्ये बाईचा माणूस करण्याची ताकद असते, असे म्हणतात. सर्वसामान्य जनता राजकीय नेत्यांवर ठेवत नसेल, एवढा विश्वास प्रशासकीय यंत्रणेवर ठेवते. कारण ही यंत्रणा नियमांच्या चौकटीत काम करते, असे आजही लोकांना वाटते. म्हणून आपल्याकडे सरकारला मायबाप म्हणण्याची पद्धत आहे. सरकारला जनतेने एकदा मायबाप म्हटले, याचा अर्थ आईच्या मायेने आणि बापाच्या धाकाने जनतेचे रक्षण होईल. हा मोठा विश्वास जनता सरकार नावाच्या अदृश्य व्यवस्थेवर ठेवत असते. मात्र, ही यंत्रणादेखील हाडामासाच्या माणसांचीच असते. 

नीतिमूल्यांचा ऱ्हास जसा समाजात होत आहे, तसाच तो या यंत्रणेतील कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये होऊ लागला आहे. चांगले काम करणाऱ्यांची कदर होत नाही. वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही. त्यामुळे 'मला काय त्याचे' ही वृत्ती वाढीस लागली आहे. महादेवाचा गाभारा जसा विचारणार..? सगळ्यांनी पाण्याने भरला, तसे प्रत्येक जण सरकारी यंत्रणेत वावरत आहे. एक म्हातारी दुधाची वाटी घेऊन येते; प पायऱ्यांवर उभी राहते. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अवस्था अशीच आहे. उदाहरण म्हणून सांगायचे तर एक्साइज डिपार्टमेंटमध्ये त्या खात्याचेच नाही तर अन्य खात्याचे मंत्रीही बदल्यांमध्ये नको तेवढा रस घेऊ लागले आहेत. मंत्री आणि मंत्र्याचे खासगी सचिव आपला विभाग सोडून एक्साइज विभागाच्या बदल्यांमध्ये कसा आणि किती रस घेतात, हे पाहिले तर शिसारी यावी, असा सगळा प्रकापर आहे. जो जास्त पैसे देईल, त्या  अधिकाऱ्याला त्याच्या आवडीची बदली मिळते. त्याला हवी ती पोस्टिंग मिळते. मंत्र्यांनीच बदल्यांचे रेट कार्ड करून ठेवले आहे. ते मंत्री आता मुंबई तुंबल्यानंतर कोणत्या तोंडाने अधिकाऱ्यांना जाब विचारणार?

मुंबई महापालिकेने नालेसफाईचे मोठमोठे दावे केले. पावसाळ्यापूर्वी नऊ लाख ८० हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी नऊ लाख ८४ हजार मेट्रिक टन गाळ काढला गेला. असा दावा पालिकेने केला. उद्दिष्टापेक्षा अर्धा टक्का जास्त गाळ काढला , असा दावा महापालिकेने केला. यासाठी . २२६ कोटींची तरतूद केली गेली. लहान- मोठ्या नाल्यांसाठी प्रत्येकी २० कोटी रुपये आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, पहिल्याच दिवशी झालेल्या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी सबवेखालील गटार इतके तुंबले की दोन्ही तुंबले. अंधेरी बाजूने वाहतूक बंद करावी लागली. तिथे साफसफाईच झाली नसल्याचे समोर आले. लोकांना आपल्या कार विजेच्या खांबाला दोरीने बांधून ठेवाव्या लागल्या. साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खाली मोठ्या प्रमाणावर पाणी गटाराच्या बाहेर येऊन वाहतूककोंडी झाली. सायन सर्कल, कांदिवली, एस. व्ही. रोडवर पाणी तुंबल्याचे असंख्य फोन आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेले दावे प्लास्टिक बंदीची घोषणा कागदावर राहिली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेले दावे गेले कुठे? बिल्डर, ठेकेदारांचीच महापालिकेत गर्दीमेट्रो, कोस्टल रोड आणि अन्य विकासाच्या नावाखाली अख्खी मुंबई ठिकठिकाणी खोदून ठेवली आहे. हा सपूर्ण पावसाळा मुंबईत जेव्हा जेव्हा पाऊस येईल, तेव्हा कालच्यासारखी किबहुना त्यापेक्षा बिकट अवस्था पाहायला मिळेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

या शहराचे शिस्तबद्ध नियोजनमहापालिकेने नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात त्याची धूळधाण कराये, पाण्याचा निचरा उडाली. साकीनाका येथे रविवारी सकाळी नाल्यातून एवढा गाळ बाहेर काढण्यात आला. हा होण्यासाठी नालेसफाई गाळ आधीच काढला असता, तर तिथे पाणी तुंबले नसते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

वेळच्या वेळी करावी. एवढ्या बेसिक गोष्टीही कोणाला कराव्या सोसायट्यामधून ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची सक्ती केली जाते. मात्र, महापालिकेच्या गाड्या ओला आणि सुका कचरा एकाच डंपरमध्ये भरून दिवसाढवळ्या घेऊन जातात. त्याबद्दल कसलेही नियंत्रण नाही.

बिल्डर, ठेकेदार याचीच गर्दी हल्ली महापालिकेत दिसते. सर्वसामान्य नागरिकाना तक्रारी करण्यासाठी म्हणून एक अँप महापालिकेने तयार केले. त्यावर येणाच्या तक्रारी महापालिकेने जाहीर केल्या पाहिजेत. म्हणजे लोकाच्या खया समस्या काय आहेत, हे कळेल. केवळ पर्सेप्शन तयार करण्यापलीकडे कोणालाही काही करायचे नाही.  

 

टॅग्स :मुंबईमुंबई मान्सून अपडेटमुंबई महानगरपालिका