Join us

मुंबई : वाढत्या महागाईच्या विरोधात आज आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 4:47 PM

गेले अनेक दिवस वाढत आहेत पेट्रोल, डिझेलचे दर. सामान्यांच्या खिशाला कात्री. 

ठळक मुद्देगेले अनेक दिवस वाढत आहेत पेट्रोल, डिझेलचे दर.

मुंबई : वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल आणि खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीने सर्व सामान्य माणूस हवालदिल झाला आहे.या विरोधात आज छत्रपती शाहू महाराज जयंती या दिवशी राष्ट्र सेवा दल, सिपीआय, सिपीएम,आपच्या वतीने मालवणी,मालाड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, औद्योगिक प्रगती, शेती विकास यासारखे अनेक क्रांतिकारी निर्णय घेणारे रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून राष्ट्र सेवा दल मालवणीच्यावतीने वाढतr महागाई आणि केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्या विरोधात समविचारी पक्ष आणि संघटना सोबत मालवणी, मालाड, मुंबई येथील गेट क्रमांक १ येथे जाहीर धरणा आंदोलन केले.

राष्ट्र सेवा दल, मालवणी, मालाड, सीपीआय, सीपीएम,आणि आम आदमी पार्टी  यांच्या सहयोगाने झालेल्या  महागाई विरोधी आंदोलनात आवाज उठविण्यात आला. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलअन्नमुंबई