मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्या बाजुने बोरघाटात दरड कोसळली आहे. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही दरड हटविण्याचे काम सुरु असून एक लेनवरून वाहतूक सुरु करण्यात आल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. (landslide on the Mumbai-Pune expressway at bhor ghat km 39. )
किलोमीटर 39 वर ही दरड कोसळली. रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या दरड बाजुला करण्याचे काम सुरु असून वाहतूक धीम्या गतीने सुरु करण्यात आली आहे.
सहा वर्षांपूर्वी मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू झालेलासहा वर्षांपूर्वी म्हणजे 19 जुलै, 2015 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली नजीक आदोशी बोगद्याच्या तोंडावरच दरड कोसळली होती. मोठे दगड एका कारवर आदळल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला होता. तर तीन महिला जखमी झाल्या होत्या. यानंतर या भागाचे काम हाती घेण्यात आले होते.