Join us

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : २९ हजार चालकांकडून दोन वर्षांत सहा कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 5:03 AM

देशाच्या आर्थिक राजधानीत प्रवेशासाठी सुलभ मार्ग ठरणाºया मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढत असून बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाणही वाढत

जमीर काझी  मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत प्रवेशासाठी सुलभ मार्ग ठरणाºया मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढत असून बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाणही वाढतआहे. त्यांना चाप लावण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून गेल्या दोन वर्षांत तब्बल २९ हजार ८८ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ५ कोटी ९० लाख ५८ हजार ८८० रुपये दंड वसूल केला.पश्चिम व दक्षिण महाराष्टÑातून मुंबईत ये-जा करण्यासाठी उपयुक्त ठरत असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे २००३पासून कार्यान्वित असून तो ९४ किलोमीटर लांब आहे. यामध्ये घाटीचा परिसर जवळपास १९ किलोमीटर इतका अहे.या ठिकाणाहून रोज सरासरी ३० हजार वाहनांची ये-जा होत असते. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण जवळपास ४ हजारांवर आहे.वर्दळ वाढत असून बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात तसेच वाहतूककोंडी होते.दोन वर्षांत या मार्गावर ६४१ अपघातांच्या घटना घडल्या असून १८६ जणांचा बळी गेला आहे. २०१७मध्ये अपघातांंची संख्या ३६०पर्यंत वाढली असून ८९ मृत्यू तर १०५ गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांकडून बेदरकार व बेशिस्तपणे गाड्या चालविणाºयांवर विविध कलमांतर्गत कारवाईकेली जात आहे. त्यामध्येगुप्तता बाळगून करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लेन कटिंग करणारे, अतिवेगाने आणि अचानकपणे रस्त्यावर वाहने थांबविणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येतआहे. यामध्ये १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत २९ हजार ८८ चालक सापडले आहेत. २०१७ या वर्षात त्यामध्ये सर्वाधिक १ लाख ८६ हजार बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून ४ कोटी ३१ लाख ७६ लाख ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.‘एक्स्प्रेस-वे’वरील चार चौक्यांपैकीपळस्पे चौकीवर (टॅप) कारवाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. या एका ठिकाणाहून जवळपास दोन कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे.