मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दरड कोसळली! जीवितहानी नाही, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:13 AM2023-07-24T00:13:23+5:302023-07-24T00:14:26+5:30

दरड कोसळून मातीचा लगदा रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा

Mumbai Pune Expressway Traffic Jam due to landslide Rescue Operation going on Mumbai Lane | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दरड कोसळली! जीवितहानी नाही, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दरड कोसळली! जीवितहानी नाही, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

googlenewsNext

Mumbai Pune Expressway Traffic Jam: रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पुणेमुंबई एक्सप्रेस वे वर मौजे आडोशी गावाजवळ मुंबईकडे येणाऱ्या लाइनवर डोंगर भागातून दरड कोसळून वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना घडली. मातीचा लगदा मुंबई बाजूच्या तिनही लेनवर पडलेला आढळला. त्यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबली आहे. मातीचा लगदा हा IRBचे जेसीबी आणि डंपर याच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम चालू आहे. साधारणतः २० ते २५ डंपर लगदा रोडवर पडलेला आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ यांच्या उपस्थितीत लगदा काढण्याचे काम चालू आहे.

Web Title: Mumbai Pune Expressway Traffic Jam due to landslide Rescue Operation going on Mumbai Lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.