मुंबई, पुणे अंतिम फेरीत

By admin | Published: April 5, 2015 12:12 AM2015-04-05T00:12:27+5:302015-04-05T00:12:27+5:30

मुंबई आणि पुणे या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना ५१व्या महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेच्या सांघिक गटाची अंतिम फेरी गाठली.

Mumbai, Pune in the final round | मुंबई, पुणे अंतिम फेरीत

मुंबई, पुणे अंतिम फेरीत

Next

मुंबई : मुंबई आणि पुणे या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना ५१व्या महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेच्या सांघिक गटाची अंतिम फेरी गाठली. मुंबईने उपांत्य सामन्यात उपनगरचा ३-० असा सहज फडशा पाडला. तर पुण्याला ठाण्याविरुद्ध २-१ असे झुंजावे लागले.
महाराष्ट्र कॅरम संघटना आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करी रोड येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईने मुंबई उपनगर विरुद्धच्या सामन्यात एकहाती वर्चस्व राखले. पहिल्या लढतीत कसलेल्या पंकज पवारने उपनगरच्या संदीप दिवेला कोणतीही संधी न देता २५-५, २५-८ असे सहजपणे नमवले. यानंतर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या रियाज अकबर अलीने आपला उच्च दर्जाचा खेळ करताना खलील शेखचा २५-४, २५-५ असा धुव्वा उडवून मुंबईला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतरच्या औपचारिकता राहिलेल्या दुहेरीच्या सामन्यातदेखील हिदायत अन्सारी-गणेश तावरे या मुंबईकरांनी वर्चस्व राखताना शब्बीर खान-सय्यद याकुब अहमद यांनादेखील सरळ दोन गेममध्ये २५-१५, २५-५ असे नमवून मुंबईला दिमाखात अंतिम फेरीत नेले.
यानंतर पुणे व ठाणे यांच्यातील उपांत्य सामना चांगलाच चुरशीचा रंगला. रहिम खानने माजी राज्य विजेता विलास दळवीला २५-१४, २५-१३ असा धक्का देत पुण्याला आघाडीवर नेले. तर यानंतर ठाणेकर कलीम शेखने राष्ट्रीय विजेता योगेश परदेसीला धक्कादायकरीत्या २५-२, २५-१२ असे नमवून खळबळ माजवली आणि ठाण्याचे आव्हान जिवंत ठेवले. मात्र दुहेरीच्या लढतीत माजी आशियाई विजेता हिदायत अन्सारीने गणेश तावरे सोबत खेळताना अशोक हटावे-झहीद अहमद यांचा २५-१५, २५-५ असा पाडाव करून पुण्याच्या विजयावर शिक्का मारला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mumbai, Pune in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.