मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:07 AM2021-09-26T04:07:59+5:302021-09-26T04:07:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विमानतळाहून आता मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला आहे. विनावातानुकूलित आणि वातानुकूलित टॅक्सीभाड्यात १०० रुपयांची ...

Mumbai-Pune taxi journey expensive | मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला

मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विमानतळाहून आता मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला आहे. विनावातानुकूलित आणि वातानुकूलित टॅक्सीभाड्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वातानुकूलित टॅक्सीसाठी आता ४२५ ऐवजी ५२५, तर विनावातानुकूलित टॅक्सीसाठी ३५० ऐवजी ४५० रुपये प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवासासाठी द्यावे लागणार आहे. खटुवा समितीच्या शिफारशीनुसार मुंबई-पुणे टॅक्सीची भाडेवाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे.

खटुवा समितीच्या शिफारशीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सीची भाडेवाढ करून प्रतिकिलोमीटर दर १६.९३ रुपये करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता परिगणना केली असता प्रतिप्रवासी भाडे ६५६ रुपये, तर कुल कॅब टॅक्सी भाडेदरात वाढ करून प्रतिकिलोमीटर २२. २६ करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता परिगणना केल्यानंतर प्रतिप्रवासी भाडे ८६३ रुपये इतके येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर २.९४ रुपये तर कुल कॅबसाठी प्रतिकिलोमीटर ४.८१ रुपये वाढविण्यात आले आहेत.

Web Title: Mumbai-Pune taxi journey expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.