लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना एक-एक लेन वाढवण्यात येणार आहे. यामुळे या द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार असून प्रवासाला गती मिळणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे ७० हजार वाहनांची वाहतूक होते. प्रवास अधिक गतिमान व्हावा म्हणून एमएसआरडीसीने आणखी एक लेन वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला. यासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
१० नवीन बोगदे द्रुतगती मार्गावर लेन वाढवताना अतिरिक्त जागेची आवश्यकता असणार आहे. एमएसआरडीसीच्या ताब्यात काही जागा आहेत, तर आणखी काही गावांतील जागांचे संपादन करावे लागणार आहे.शिवाय या मार्गावर १० नवीन बोगदेदेखील बांधावे लागणार आहेत. सध्याच्या बोगद्यांचा विस्तार केला जाणार नाही. मात्र, अपघातप्रवण क्षेत्राच्या जागी उड्डाणपूल बांधण्यात येणार असून ११ उड्डाणपूल बांधण्यात येतील.
दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना येत्या आठ दिवसांत दिशादर्शक फलकांची संख्यादेखील वाढविली जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यात ही वाहने मोठ्या प्रमाणात लेन कटिंग करत असतात. त्यामुळे या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.