Join us

मुंबई आर सेंट्रल वॉर्ड: थाट वेगळाच, पण वैद्यकीय सुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 5:05 PM

जवळपास ८१ उद्याने, विपुल वृक्षराई, नॅशनल पार्क, गोराई खाडी, आपली संस्कृती टिकवून असलेली गावठाणे यामुळे बोरीवलीचा थाट काही वेगळाच आहे.

जवळपास ८१ उद्याने, विपुल वृक्षराई, नॅशनल पार्क, गोराई खाडी, आपली संस्कृती टिकवून असलेली गावठाणे यामुळे बोरीवलीचा थाट काही वेगळाच आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांमुळे यात भर पडणार आहे. अनेक जुन्या इमारतींचा वस्त्यांचा पुनर्विकास होत असल्याने वॉर्डात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. पूर्वेला उभ्या राहणाऱ्या ओबेरॉय, रुस्तुमजीच्या टॉवर्सनी पश्चिमेच्या बोरीवलीलाही मागे टाकले आहे. मिश्र वस्ती असलेल्या बोरीवलीकरांना फक्त एकाच गोष्टीची उणीव जाणवते ती म्हणजे दर्जेदात वैद्यकीय सुविधांची. फेरीवाल्यांना प्रश्नही जटिल बनत चालला आहे. 

हद्द-पूर्व सीमापूर्व सीमा- नॅशनल पार्क, बोरीवली पूर्वपश्चिम- गोराई गाव (खाडी पलीकडे), बोरीवली पश्चिम, उत्तर- देवीदास लेन ते सुधीर फाळक पुलाजवळ, नॅन्सी कॉलनी, बोरीवली पूर्वदक्षिण- ९० फूट डी.पी.रोड, बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली पश्चिम.

वॉर्डाचे वैशिष्ट्यनॅशनल पार्क आणि खाडीच्या पलीकडील गोराई गाव, यांच्या मध्यभागी वसलेली निम्न, मध्यम, उच्च, श्रीमंत अशी वस्ती हे बोरीवलीचे वैशिष्ट्य. 

इथे झोपडपट्ट्या फारशा नाहीत. ज्या आहेत त्यांच्याही एसआरएमध्ये पुनर्विकास होतो आहे. जुनी गावठाणे मात्र आहेत. उपनगरात राहण्यासाठी बोरीवलीला प्राधान्य दिले जाते. विपुल वृक्षराई आणि मोकळी मैदाने, उद्याने ही या वॉर्डाची ओळख. इथे १४ उद्याने आणि १९ मैदाने तर जवळपास ३३०० मीटर लांबीचे नाले असून पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई हा मोठा कार्यक्रम असतो. पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असूनही मोठे रुग्णालय नाही. मोठे आजार, शस्त्रक्रियांकरिता अंधेरीच्या पुढे असलेल्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. 

महापालिका प्रभाग- १०माजी नगरसेवक- १०

श्वेता कोरगावकर- वॉर्ड क्र.९जितेंद्र पटेल- वॉर्ड क्र. १०रिद्धी खुरसंगे- वॉर्ड क्र. ११गीता सिंघम- वॉर्ड क्र. १२विद्यार्थी सिंग- वॉर्ड क्र. १३आसावरी पाटील- वॉर्ड क्र. १४प्रवीण शहा- वॉर्ड क्र. १५अंजली खेडकर : वॉर्ड क्र. १६ बीना दोशी : वॉर्ड क्र. १७ संध्या दोशी : वॉर्ड क्र. १८ 

संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त :बोरीवलीत गोराई, गोराई गाव आणि नॅशनल पार्क येथे पाण्याची समस्या आहे. त्यापैकी गोराईतील पाण्याच्या वाहिन्या रस्त्यांच्या कामांसोबत विस्तारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न येत्या काळात सुटेल. नॅशनल पार्कमधील वस्त्यांना पाणी पोहोचविण्यात कायदेशीर अडचणी आहेत.

बोरीवलीत फेरीवाल्यांचा प्रश्न मोठा आहे. फेरीवाला धोरण आल्यानंतर त्यावर मार्ग काढणे सोपे होईल.सुशोभीकरणाची कामे सुरू असून दोन वर्षांत सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण होणार आहे. एक्स्प्रेस हायवे आणि लिंक रोड यांना दोन उड्डाणपुलांनी जोडण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

महत्वाची पर्यटन स्थळे :नॅशनल पार्क, वझिरा नाका गणेश मंदिर, पागोडा, गोराई समुद्रकिनारा

रुग्णालये : कस्तुरबा पालिका रुग्णालय, बोरीवली मॅटर्निटी होम, एस.व्ही. रोड., चारकोप मॅटर्निटी होम, कांदिवली., मदर ॲण्ड चाइल्ड हॉस्पिटल, सिद्धार्थनगर.

वॉर्डातील मुख्य समस्या  

 फेरीवाल्यांना प्रश्न उग्र बनत चालला आहे. खासकरून एस. व्ही. रोड दुपारी २ नंतर वाट काढणे मुश्कील बनते. चंदावरकर,  एलटीएल रोडवरील फुटपाथ तर फेरीवाल्यांनीच गिळंकृत करून टाकले आहे.

 इमारतींचे बेशिस्तपणे केलेल्या बांधकामामुळे फुटपाथवरून चालणे शक्य होत नाही.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका