मुंबई-रायगड अवघ्या २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९०% काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:03 AM2023-01-12T06:03:51+5:302023-01-12T06:04:04+5:30

ट्रान्स हार्बर लिंकवर सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी

Mumbai - Raigad in just 20 minutes; 90% work of Mumbai Trans Harbor Link complete | मुंबई-रायगड अवघ्या २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९०% काम पूर्ण

मुंबई-रायगड अवघ्या २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९०% काम पूर्ण

googlenewsNext

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) समुद्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, आता १८० मीटर असा सर्वात लांब अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी करत प्राधिकरणाने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. विशेष म्हणजे सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटांत पार करता येईल.

मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा २२ किमी लांबीचा हा देशातील सर्वात मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा होईल. शिवाय नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची बचत होईल. प्रदूषणविरहित असा हा प्रकल्प असून, काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची काळजी घेण्यात आली आहे. 

शिवडी ते न्हावा शेवादरम्यान अरबी समुद्रात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारल्या जात असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यावर १८० मीटर लांबीच्या सर्वात मोठ्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी केल्याने कामातील मोठा टप्पा पार पडला आहे.

पॅकेज एक : एल अँड टी (० ते १०.३८० किमी)
पॅकेज दोन : डीएईडब्ल्यूओओई अँड सी - टाटा प्रकल्प जेव्ही (१०.३८० ते १८.१८७ किमी)
पॅकेज तीन : एल अँड टी (१८.१८७ ते २१.८०० किमी)
पॅकेज चार : इंटेलिंजट ट्रान्सपोर्ट सिस्टीम
इंटरचेंज : मुंबईच्या बाजूने शिवडी आणि नवी मुंबईच्या बाजूने शिवाजी नगर व चिर्ले

सागरी सेतूमुळे मुंबई ते न्हावा शेवा अंतर २० मिनिटांत पार करता येईल. मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा २२ किमी लांबीचा हा देशातील सर्वात मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या पुलावरून दररोज किमान एक लाख वाहनांची ये-जा होईल, असा अंदाज आहे. 

Web Title: Mumbai - Raigad in just 20 minutes; 90% work of Mumbai Trans Harbor Link complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.