Mumbai Railway Update: सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन फेल, मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 08:43 PM2022-08-18T20:43:18+5:302022-08-18T21:05:57+5:30
Mumbai Railway Update: मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन भिवपुरी स्टेशनजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेची कर्जत आणि पुण्याकडे जाणारी वाहतून ठप्प झाली आहे.
मुंबई - मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन भिवपुरी स्टेशनजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेचीकर्जत आणि पुण्याकडे जाणारी वाहतून ठप्प झाली आहे. साधारण साडेसात वाजल्यापासून सिंहगड एक्स्प्रेस भिवपुरी स्टेशनजवळ खोळंबलेली आहे. दरम्यान, पर्यायी इंजिनची व्यवस्था करून एक्स्प्रेसला मार्गस्थ करण्यासाठी इंजिन रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याचा फटका लोकल वाहतुकीलाही बसला आहे. तसेच कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
@Central_Railway Sinhagad express stopped from half and hour near bhiwpuri road station, karjat. No local trains also start. What happened? #mumbailocal#Mumbai#local#karjatpic.twitter.com/AD5pv4kv0B
— Hemant Bavkar (@hem_rb) August 18, 2022
याबाबत अधिक माहिती देताना कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी लोकमतला सांगितले की, भिवपुरी व नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान पाऊन तासापुर्वी सिंहगड एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्यामुळे कर्जत, पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. पुढील एक तासात रेल्वे वाहतुक सुरळीत होईल. अशी माहिती मिळाली आहे.
Train 11009 CSMT - Pune Sinhgad Exp loco failed b/w Neral - Bhivapri down line. Time 7.45pm onwards. Another loco /engine being given from Karjat.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) August 18, 2022
Will update you once it is cleared.