Mumbai Rain: फक्त 48 तास 400 गाड्या पाण्यात होत्या...; पाणी ओसरताच वाहनांची झाली ही हालत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:13 PM2021-07-19T19:13:56+5:302021-07-19T19:15:13+5:30
Mumbai Rain update: कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथील पालिकेच्या पार्किंग लॉट मध्ये 400 वाहनांचे झाले मोठे नुकसान झाले. आमदार अतुल भातखळकर आणि प्रभाग क्रमांक 24 च्या स्थानिक नगरसेविका सुनीता यादव यांनी काल दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुमारे 20 फूट एक मजल्या इतके पाणी येथे साचले होते अशी माहिती त्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
Mumbai Rain: मुंबई-पालिकेच्या वाहन पार्किंग मध्ये वाहने सुरक्षित राहण्यासाठी वाहनचालक आपली वाहने ठेवतात. मात्र दि,17 जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात वेगाने पाण्याचा लोंढा कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स येथील पालिकेच्या पार्किंग लॉट मधील 400 वाहनांचे झाले मोठे नुकसान झाले आहे.
ठाकूर कॉम्प्लेक्स येथील वसंत प्राईड या इमारतीत पालिकेचा पार्किंग लॉट आहे. दि,17 जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात येथे सुमारे 20 फूट पाणी साचले. यामुळे येथे असलेल्या प्रामुख्याने,बाईक, रिक्षा आणि चार चाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. (400 vehicals stuck in 20 feet flood water at kandivali's Thakur Complex Parking.)
सुमारे 48 तास झाले तरी अजून येथील तुंबलेले पाणी काढले नाही. तरी येथील तुंबलेले पाणी काढून क्रेनच्या साहाय्याने वाहने बाहेर काढावीत. तसेच नुकसान झालेल्या वाहनांना पालिकेने 15000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुंबई भाजपाचे प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्याकडे केली आहे.
मुसळधार पावसामुळे 20 फूट पाण्यात
कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथील पालिकेच्या पार्किंग लॉट मध्ये 400 वाहनांचे झाले मोठे नुकसान झाले. आमदार अतुल भातखळकर आणि प्रभाग क्रमांक 24 च्या स्थानिक नगरसेविका सुनीता यादव यांनी काल दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुमारे 20 फूट एक मजल्या इतके पाणी येथे साचले होते अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या कोविड लॉकडाऊन मुळे येथील अनेक रिक्षावाले आपल्या रिक्षा पार्क करून गावी गेले आहेत.तर अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहने देखिल येथे सुरक्षित राहण्यासाठी वाहनधारकांनी पार्क केली होती. मात्र सुमारे 20 फूट पाणी येथे तुंबल्याने आणि येथील असलेल्या 400 वाहनांमध्ये आणि इंजिन मध्ये पाणी गेल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.
दरम्यान पालिकेचे परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की,आम्ही येथे पालिकेची यंत्रणा तैनात करून येथील तुंबलेले पाणी काढले.