Join us

Mumbai Rain Live Updates: मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 7:45 AM

मुंबई - शनिवारपासून शहरात आणि राज्यभरात सुरु असणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडत ...

04 Aug, 19 08:44 PM

मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी

04 Aug, 19 07:40 PM

मध्य रेल्वेकडून काही एक्सप्रेस गाड्या रद्द

04 Aug, 19 07:39 PM

कोकण रेल्वेवरील काही गाड्या रद्द

04 Aug, 19 06:45 PM

कर्जत-लोणावळा मार्गाची वाताहत, पाहा व्हिडीओ

04 Aug, 19 06:30 PM

मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळा बदलल्या

04 Aug, 19 04:57 PM

नाशिकमधील शाळा सोमवारी बंद राहणार

04 Aug, 19 04:53 PM

कल्याण-कर्जत वाहतूक दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता

04 Aug, 19 04:47 PM

नांदखुरी गावातील 56 जणांची केली सुटका

04 Aug, 19 03:08 PM

रायगड येथे NDRF टीमकडून बचावकार्य सुरु

04 Aug, 19 02:40 PM

कामशेतमध्ये पुरात अडकलेल्या गायीला NDRF टीमनं वाचवलं

04 Aug, 19 02:34 PM

भिवंडीतील अनेक भागांत पुराचं पाणी साचलं

04 Aug, 19 02:34 PM

समुद्राला आलं उधाण

04 Aug, 19 02:33 PM

खडकवासला धरण ओव्हर फ्लो, थोड्याच वेळात दरवाजे उघडणार

पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण भरले असून दुपारी 3 च्या सुमारास धरणातून 41 हजार 756 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येईल अशी माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

04 Aug, 19 02:31 PM

पुण्यातील सांगवी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं

04 Aug, 19 01:12 PM

खांडवली येथे पुरात अडकलेल्या 35 ग्रामस्थांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांची एअरफोर्सला विनंती

मुंबईसह राज्यात अतिवुष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्कालिन परिस्थितीतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुरात अडकलेल्या खांडवली नजिकच्या नांदखुरी येथील सुमारे ३५ ग्रामस्थांची हेलीकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी अशी विनंती भारतीय हवाई दलाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

04 Aug, 19 12:23 PM

ठाणे-कल्याण रेल्वे वाहतूक धीम्यागतीने सुरु

04 Aug, 19 12:08 PM

दिंडोशी येथे टेकडीचा काही भाग कोसळला; 4 जण जखमी

मुसळधार पावसामुळे दिंडोशी येथील राजीव गांधी नगरमध्ये टेकडीचा भाग कोसळला, या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. 

04 Aug, 19 11:20 AM

NDRF च्या प्रत्येकी 8 टीम महाराष्ट्र आणि गुजरातला पाठविल्या

04 Aug, 19 11:19 AM

मुंबईच्या वाकोला भागात पावसामुळे पाणी साचलं

04 Aug, 19 10:11 AM

शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर झाला परिणाम

मुंबई - हिंदमाता, जे.बी नगर(अंधेरी), दहिसर चेक नाका, समता नगर(कांदिवली) या भागात पावसामुळे साचलं पाणी 

 

04 Aug, 19 09:37 AM

मुंबईकरांनो, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका - हवामान विभाग

पुढील काही तास मुंबईत अतिवृष्टी कायम राहील. दुपारनंतर समुद्रामध्ये 4.5 मि. हायटाईड असल्याने मिठी नदीची पाण्याची पातळी वाढेल. मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

04 Aug, 19 09:34 AM

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूर परिस्थिती

04 Aug, 19 08:53 AM

मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर साचलं पाणी, मध्य रेल्वे ठप्प

04 Aug, 19 08:03 AM

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, सायन-कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी

मुसळधार पावसामुळे कुर्ला-सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सायन-ते कुर्ला मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. 

04 Aug, 19 07:57 AM

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु



 

04 Aug, 19 07:55 AM

सायन परिसरातील रस्ते पाण्याखाली, पावसाचा जोर कायम

शनिवारपासून पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्याने अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सायन परिसरात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. 

04 Aug, 19 07:48 AM

पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकात पाणी साचलं

टॅग्स :पाऊसहवामान