Join us

Mumbai Rain Live Updates: सहा तासांनंतर सीएसएमटी-वाशी लोकल वाहतूक सुरू; गर्दीमुळे प्रवाशांच्या त्रासात भर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 7:45 AM

मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. ...

03 Aug, 19 08:02 PM

दादर ते सायनपर्यंत मोठी वाहतूक कोंडी

लोकलसेवा ठप्प झाल्याने रस्त्यावरील ताण वाढला आहे. त्यातच लोकल सुरू झाल्याने गर्दीमुळे बऱ्याच प्रवाशांनी रस्तेमार्गाने घर गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना दादरहून सायनपर्यंत जाण्यासाठी दोन तास लागत आहेत. यामुळे लोकल वाहतूक रखडलेली असताना रस्त्यांवरही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 

03 Aug, 19 07:59 PM

सहा तासांनंतर सीएसएमटी-वाशी लोकल वाहतूक सुरू

मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरळीत झाली असून लोकल विलंबाने धावत आहेत. तर फास्ट मार्गावरील लोकल कमी वेगामध्ये धावत आहेत. मात्र, रात्री 8 वाजेपर्यंत हार्बर लाईनवरील कुर्ला-सीएसटी मार्ग ठप्पच होता. नुकताच हा मार्ग खुला करण्यात आला असून सीएसटीहून वाशीकडे लोकल सोडण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

03 Aug, 19 06:36 PM

सीएसएमटी-कल्याण जलद मार्गावरील लोकल वाहतूकही पूर्ववत

सीएसएमटी-कल्याण जलद मार्गावरील लोकल वाहतूकही पूर्ववत करण्यात आली असून या मार्गावरील पहिली लोकल 18.21 वाजता सोडण्यात आली. मात्र, सावधगिरीम्हणून लोकल कमी वेगात धावत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

03 Aug, 19 05:00 PM

सीएसएमटी ते कुर्ला अप-डाऊन मार्गावरील लोकल लवकरच सुरू होणार

सीएसएमटी ते कुर्ला अप-डाऊन मार्गावरील लोकल 15 मिनिटांत सुरू होणार

03 Aug, 19 05:00 PM

बेस्टने सोडल्या जादा बसेस

बेस्टने वडाळा रोड रेल्वे स्थानकातून कुर्लाकडे दोन बस, देवनार ते वाशीसाठी 5 विशेष बस रवाना केल्या आहेत. देवनार ते सायन मार्गावर चार बसेस सोडल्या आहेत. 

03 Aug, 19 04:53 PM

कुर्ला ते कल्याण, खोपोली, कसारा ट्रेन अप-डाऊन धीम्या मार्गावरून सुरु

कुर्ला ते कल्याण, खोपोली, कसारा ट्रेन अप-डाऊन धीम्या मार्गावरून सुरु झाल्या आहेत. कुर्ला स्थानकातून 16.43 वाजता कल्याणकडे पहिली लोकल निघाली आहे. 

 

03 Aug, 19 04:44 PM

कुर्ला ते कल्याण, खोपोली, कसारा ट्रेन अप-डाऊन धीम्या मार्गावरून 10 मिनिटांत सुरु होणार

कुर्ला ते कल्याण, खोपोली, कसारा ट्रेन अप-डाऊन धीम्या मार्गावरून 10 मिनिटांत सुरु होणार

03 Aug, 19 04:35 PM

पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना;पालिकेकडून निवाऱ्याची सोय


पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी महापालिकेने निवाऱ्याची सोय केली आहे. सीएसटी स्थानकानजीकच्या मनोहरदास स्कूल, बोराबाजार; दादर नजीक भवानी शंकर रोडवरील गोखले पालिका शाळा आणि मोरेश्वर पाटणकर स्कूल, कुर्ला याठिकाणी निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या ठिकाणी पाणी, चहा आणि नाष्त्याची सोय करण्य़ात आली आहे. 

03 Aug, 19 04:06 PM

मानखुर्दमध्ये रेल्वे रुळावर पुलाचा मलबा कोसळला

मानखुर्दमध्ये रेल्वे रुळावर पुलाचा मलबा कोसळला; ठाणे स्थानकात पाणी साचले. कुर्ला स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने मध्य आणि हार्बर लाईन दोन तासांपासून पूर्णपणे ठप्प झालेली आहे. 

03 Aug, 19 03:52 PM

औरंगाबादेतील गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढविल्याने वैजापुर तालुक्यातील नदीकाठच्या १७ गावांना सतर्कतेचा इशारा

03 Aug, 19 03:39 PM

हिंगोलीतील कयाधू नदीला पूर आल्याने आखाडा बाळापुर तालुक्यातील शेवाळा, देवजना, कवडी परिसरातील अनेक गावे बाधित

03 Aug, 19 01:07 PM

साताऱ्यात कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले, 12 हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग

03 Aug, 19 12:01 PM

मुंबईतल्या मालाडमधल्या अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी

03 Aug, 19 11:53 AM

पालघर-डहाणू रोडवरील सूर्या नदीचा पूल पाण्याखाली, तीन गायी गेल्या वाहून

03 Aug, 19 11:35 AM

उल्हासनगर, ठाणे येथे विजेच्या धक्क्याने दोन तरूण दगावले, कल्याणच्या टाटा पावर हाऊससह चारही नद्यांच्या परिसरात पुराचे पाणी

03 Aug, 19 10:59 AM

नाशिकमधल्या गंगापूर पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणातून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला. 11 हजार 368 क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पुन्हा पूर आला

03 Aug, 19 10:36 AM

मुसळधार पावसानं भातसा धरणाचे दरवाजे उघडले, सापगाव ब्रिज वाहतुकीसाठी बंद

03 Aug, 19 10:35 AM

उल्हासनगर : वालधुनी नदीने गाठली धोक्याची पातळी, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयासह नदी किनाऱ्यावरील असंख्य घरात पुराचे पाणी घुसल्याने, नागरिकांत भीतीचे वातावरण

03 Aug, 19 10:27 AM

मनोर ते पालघर रोड बंद झाला असून, मनोर पोलीस ठाण्यापासून 500 मीटर अंतरावर असलेला कोळशे पूल पाण्याखाली बुडाला

03 Aug, 19 10:22 AM

पालघरचे जिल्ह्याधिकारी कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना केली सुट्टी जाहीर

03 Aug, 19 10:01 AM

येत्या 4 ते 6 तासांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

03 Aug, 19 09:48 AM

नाशिकमध्ये संततधार सुरूच, काल रात्री आठ वाजता गंगापूर धरणातून 8 हजार क्युसेक विसर्ग

03 Aug, 19 09:33 AM

मुंबई- गोवा महामार्गावरील रायगडमधीलच्या पोलादपूरजवळ भूस्खलन, महामार्ग ठप्प

03 Aug, 19 09:11 AM

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिरानं

03 Aug, 19 08:54 AM

मुसळधार पावसामुळे 3 ऑगस्ट रोजी ठाण्याच्या पालिका आयुक्तांनी सर्व शाळांना सुट्टी केली जाहीर
 

03 Aug, 19 08:29 AM

पालघरमध्ये मुसळधार पावसानं पूरसदृश्य स्थिती, अनेकांच्या घरात घुसलं पाणी

03 Aug, 19 08:26 AM

सकाळी 8.11ची बदलापूर-सीएसमटी लोकल पुढील सूचना मिळेस्तोवर निघणार नाही...

03 Aug, 19 08:26 AM

साताऱ्यातील कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस,  सर्व दरवाजे काही तासांत उघडणार

03 Aug, 19 08:13 AM

पावसामुळे दहिसर टोलनाक्याजवळ पाणी साचलं, अंधेरी सब वे आणि मालाड सबवेमध्येही घुसलं पाणी

03 Aug, 19 08:10 AM

मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं

03 Aug, 19 08:05 AM

मुसळधार पावसानं श्रीवर्धन-माणगाव रस्ता पाण्याखाली, वाहतुकीसाठी केला बंद

03 Aug, 19 08:04 AM

कल्याण: गोविंदवाडी परिसरात पाणी साचले असून त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.

03 Aug, 19 08:03 AM

 खेडमध्ये मुसळधार पावसानं बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी, खेड-दापोली रस्ता बंद

03 Aug, 19 08:02 AM

मुंबईत दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

03 Aug, 19 07:59 AM

मुसळधार पावसानं डोंबिवली मिलापनगरमध्ये साचलं पाणी

03 Aug, 19 07:57 AM

ठाण्यात अजून पावसाचा जोर कायम

03 Aug, 19 07:49 AM

डोंबिवली: पहाटेपासून शहरात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

03 Aug, 19 07:47 AM

मुंबईसह उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात साचलं पाणी

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेट