Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत पाणी; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 08:15 AM2021-07-22T08:15:12+5:302021-07-22T08:16:55+5:30
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला पाऊस. उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत भरलं पाणी.
बुधवारी रात्रीही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच होता. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी आणि कसारा स्थानकारदरम्यान, तसंच अंबरनाथ आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकल सेवा थांबवण्यात आली.
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या दोन्ही मार्गावरील वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कसारा परिसरात केवळ ४ तासांमध्ये १३९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं आहे.
Maharashtra | Mumbai local train service between Umbermali railway station and Kasara halted due to heavy rainfall. Train service between Igatpuria and Khardi has been temporarily stopped due to waterlogging on tracks: CPRO, Central Railway
— ANI (@ANI) July 21, 2021
(Image: Umbermali railway station) pic.twitter.com/PHZEHeQyJ7
#WATCH | Maharashtra: Rain lashes parts of Mumbai; visuals from Eastern Express Highway pic.twitter.com/mo6wr3Y8gj
— ANI (@ANI) July 21, 2021
याशिवाय कसारा येथेही ट्रॅकवर पाणी साचलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री सव्वादहा वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डीदरम्यानची वाहतूकही थांबवण्यात आली असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईतही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झाली होती. मालाड आणि जोगेश्वरीच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तर पूर्व द्रुतगती महामार्ग आणि विलेपार्ले ते वांद्रे या भागामध्येही मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला होता.
धरणांतील जलसाठा वाढला
जुलै महिन्यात मुंबईत सरासरी ८४० मिमी पावसाची नोंद होते. परंतु यावेळी १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सांताक्रुझ परिसरात १०३२.२ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठी ४ दिवसांत ३ टक्क्यांनी वाढला.