बुधवारी रात्रीही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच होता. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी आणि कसारा स्थानकारदरम्यान, तसंच अंबरनाथ आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकल सेवा थांबवण्यात आली.
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या दोन्ही मार्गावरील वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कसारा परिसरात केवळ ४ तासांमध्ये १३९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं आहे.
धरणांतील जलसाठा वाढलाजुलै महिन्यात मुंबईत सरासरी ८४० मिमी पावसाची नोंद होते. परंतु यावेळी १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सांताक्रुझ परिसरात १०३२.२ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठी ४ दिवसांत ३ टक्क्यांनी वाढला.