Join us  

Mumbai Rain Updates: मुंबईत कोसळधारा! शहर आणि उपनगरांत तुफान पाऊस, सखल भागांत पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 8:39 AM

गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Mumbai Weather Forecast ( Marathi News ) : दोन दिवसांच्या विश्रातीनंतर मुंबईत पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळपासून शहरातील काही भागांत पावसाची संततधारी सुरू झाली असून आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळे सखल भागांत पाणी साचलं आहे. गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरात आज कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतकं राहील. उद्याही मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, आज आणि उद्या मुंबईत जोरदार पाऊस कोसळल्यानंतर २० जुलै आणि २१ जुलै रोजी पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून २२ जुलै आणि २३ जुलै रोजी पुन्हा शहराला पाऊस झोडपून काढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

राज्यभरात पुढील काही दिवस कशी असेल पावसाची स्थिती? आजपासून पुढील चार दिवस म्हणजे रविवार दि. २१ जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत मुंबईसह कोकण व विदर्भातील १७ जिल्ह्यात जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटहवामानपाऊसमुंबई