जुलै, सप्टेंबरमध्ये पाऊस हिट; मॉन्सूनच्या पॅटर्नमध्ये बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 11:14 AM2024-10-10T11:14:39+5:302024-10-10T11:15:16+5:30

गरब्यावर परतीच्या पावसाचे ढग

mumbai rain hits in july september changes in monsoon patterns | जुलै, सप्टेंबरमध्ये पाऊस हिट; मॉन्सूनच्या पॅटर्नमध्ये बदल

जुलै, सप्टेंबरमध्ये पाऊस हिट; मॉन्सूनच्या पॅटर्नमध्ये बदल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून कोसळणाऱ्या मान्सूनचा पॅटर्न बदलत आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पाऊस पडत असून, तो हिट ठरत आहे. यावर्षीही जुलै आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार बरसात केली आहे. आगमनासोबत आता पावसाच्या परतीचा काळही लांबत असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत दिवसा आणि रात्री ऑक्टोबर हिट, तर सूर्यास्तावेळी परतीचा पाऊस पडत आहे. ऐन गरब्याच्या काळात परतीचा पाऊस होत असल्याने गरबाप्रेमींमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण दिसत आहे.

यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांपैकी सर्वाधिक पावसाची नोंद जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झाली. जुलैमध्ये मुंबईत सरासरी १७०० मिलिमीटर (मिमी), तर नवी मुंबई आणि ठाणे परिसरात १८०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये मुंबईत ५७० मिमीपेक्षा, तर ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात ६७० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. जुलैनंतर सप्टेंबर महिन्यांत जास्त पाऊस पडला. जूनमध्ये मुंबईत कमी पाऊस पडला असला तरी, मुंबई महानगर प्रदेशात काही ठिकाणी जास्त पाऊस होता. मुंबईत सांताक्रुझ वेधशाळेत सरासरी ३०० मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्टमध्ये सरासरी ४०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.

गेल्या काही वर्षांशी तुलना करता मान्सूनचा पॅटर्न बदलत आहे. जूनमध्ये उशिरा पाऊस सुरू होतो. जूनच्या शेवटपर्यंत मोठा पाऊस पडणे आता कमी झाले आहे. जुलैमध्ये दोन महिन्यांचा पाऊस पडू लागला आहे. जून आणि जुलैचा पाऊस आता जुलैच्या एका महिन्यात पडू लागला आहे. गेल्या काही वर्षांत ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत किंवा तसे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. यावर्षीही हाच पॅटर्न होता. ऑगस्टच्या सुरुवातीला म्हणजे ४ आणि ५ ऑगस्टला त्यानंतर २० ऑगस्टच्या आसपास चांगला पाऊस पडला. २०२१ नंतर यंदाच्या सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडला आहे. गेल्या १० वर्षांचा विचार करता सर्वाधिक पाऊस २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर २०२२ आणि आता २०२४ मध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या काही वर्षांशी तुलना करता या वर्षी कल्याण किंवा या पट्ट्यात कमी पाऊस झाला आहे. थोडक्यात मान्सूनचा पॅटर्न बदलत आहे. गेल्या पाच वर्षात जूनच्या अखेरीस म्हणजे उशिरा पाऊस सुरू होत आहे. त्याचबरोबर त्याच्या परतीचा प्रवासही उशिरा सुरू होतो. ऑक्टोबरमध्येही पाऊस पडतो आहे. जून आणि १७०२.८ ३८२.४ ऑगस्टमध्ये कमी, तर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडत आहे. ४४२.९ ६५६.९ ३०८९ - अश्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

 

Web Title: mumbai rain hits in july september changes in monsoon patterns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.