Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 11:19 AM2018-07-09T11:19:18+5:302018-07-09T12:08:17+5:30

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rain: Holiday declared for schools and colleges due to heavy rain in Mumbai | Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Next

मुंबई - मुसळधार पावसामुळेमुंबई जलमय झाली आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्यानं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.  या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाची स्थिती पाहता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सलग तिसऱ्या दिवशीही पावसानं मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  मुंबईत 24 तासांत 182 मिलीमीटर पाऊस झाल्याचे कुलाबा वेध शाळेने सांगितले आहे तर  सांताक्रुझ वेध शाळेमध्ये 137 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.  

(Mumbai Rain Live Updates: वसईत जोरदार पाऊस; मिठागरात 400 जण अडकले)




 



 



 

मुंबई-पुणे हायवे ठप्प 
मुंबई-पुणे हायवे मार्गावर खोपोलीजवळ मोठे झाड कोसळल्याने मुंबई-पुणे मार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. यामुळे मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. 

ठाणे रेल्वे ट्रॅकवर साचलं पाणी 
मुसळधार पावसामुळे मुंब्रा व कळवा रेल्वे स्टेशनवरील रुळांवर प्रचंड पाणी साचले आहे. याचा फटका वाहतूक सेवेवर बसला असून मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. 

(व्हिडीओ : मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली)

वसई-विरारमध्येही मुसळधार पाऊस 

वसई, विरार, नालासोपारा, पालघर, डहाणूला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. येथील जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे येथील कॉलेज-शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  डहाणूनहून विरारकडे जाणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वाणगाव, बोईसर, पालघर, केळवे रोड आदी स्थानकांवर लोकल थांबवण्यात आल्या आहेत.  




 

Web Title: Mumbai Rain: Holiday declared for schools and colleges due to heavy rain in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.