मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बरसत असलेल्या पावसाचा जोर आज अधिकच वाढला असून, मुंबईलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साठले आहे. तर चुनाभट्टी परिसरामध्ये दरड कोसळून तीन घरांचं नुकसान झालं आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत.
चुनाभट्टी वाहतूक विभागात नागोबा चौक, चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत ही दरड कोसळलेली असून, त्यात तीन घरांचे नुकसान झाले आहे. तर या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
शिवम प्रकाश सोनवणे आणि प्रकाश जगन्नाथ सोनवणे अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळी चुनाभट्टी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व स्टाफ उपस्थित आहे. मुंबई महानगरपालिकेकडून माती काढण्याचे काम चालू आहे.