Join us

Mumbai Rain Live Updates: पुढचे 24 तासही धो-धो! मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 7:41 PM

Mumbai Rain News and Live Updates: मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज; सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना

06 Aug, 20 06:01 PM

भिवंडीत दोन दिवसात 290 मिमी पावसाची नोंद; अनेक सखल भागात साचले पाणी

वामान खात्याने वर्तविलेल्या प्रमाणे भिवंडी शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात मागील दोन दिवसात  290 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने शहरा सोबत ग्रामीण भागातील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत होत शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन असंख्य सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.

06 Aug, 20 05:10 PM

येत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

06 Aug, 20 05:02 PM

मुंबईत पावसाचा जोर ओसरला, रिपरिप सुरूच

06 Aug, 20 04:43 PM

मुंबई शहरात ४८ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा एकूण ५७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

06 Aug, 20 04:36 PM

३३० मिलीमीटर पावसाने ऑगस्ट महिन्यातील सर्व रेकॉर्ड काढले मोडीत


 

06 Aug, 20 04:07 PM

रेकॉर्ड ब्रेक पाऊस

सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची नोंद होत असून, गुरुवारी सकाळी ५.३० वाजता नोंदविण्यात आलेल्या ३३० मिलीमीटर पावसाने ऑगस्ट महिन्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

06 Aug, 20 03:09 PM

केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी

दक्षिण मुंबई परिसराने बुधवारी ४ तासांत तब्बल ३०० मिमी पाऊस आणि प्रतितास १०१ किमी वेगवान वा-याचा सामना केला. दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंट, कुलाबासह डी विभाग क्षेत्रामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. २६ जुलै २००५ च्या प्रलयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईने अनुभवली नव्हती अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

06 Aug, 20 03:59 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापालिकेच्या 'डी विभाग' कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरच्या खचलेल्या भागाची पाहणी केली.

06 Aug, 20 03:57 PM

तुळशी आणि विहार तलाव भरले

06 Aug, 20 03:49 PM

मुंबईला पाणी पुरवठा करणा-या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव भरले असून, अद्यापही ५ तलाव भरण्याचे शिल्लक आहेत. पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार  आहे.

06 Aug, 20 03:09 PM

मुंबईच्या महापौरांनी केली खचलेल्या भागाची पाहणी

06 Aug, 20 02:34 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापालिकेच्या 'डी विभाग' कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरच्या खचलेल्या भागाची पाहणी केली.

06 Aug, 20 11:29 AM

06 Aug, 20 11:01 AM

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज महापालिकेच्या 'डी विभाग' कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरच्या खचलेल्या भागाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या प्रसंगी उपायुक्त डॉ.हर्षद काळे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड व संबंधित विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. 

06 Aug, 20 10:35 AM

आज दुपारी 1 वाजून 52 मिनिटांदरम्यान 4.33 मीटरची हाय टाइड असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, हवामान खात्याचा इशारा
 

06 Aug, 20 10:22 AM

हाय टाइड असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे

06 Aug, 20 10:08 AM

मुंबईच्या कुलाबामध्ये गेल्या 24 तासांत 331.8 मिमी पावसाची नोंद.
 

06 Aug, 20 10:07 AM

मुसळधार पावसानंतर मुंबईतील विहार तलाव भरुन वाहू लागला

06 Aug, 20 10:03 AM

Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित

06 Aug, 20 09:57 AM

सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटींग

05 Aug, 20 09:27 PM

दादर पूर्व भागात मुसळधार पाऊस; अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी

05 Aug, 20 09:09 PM

वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे पनवेल खांदा काॅलनीमधील भाजी मार्केटचं छत उडालं

05 Aug, 20 08:55 PM

मुसळधार पावसाचा मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीला फटका; साईनएजचं नुकसान



 

05 Aug, 20 08:24 PM

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात; संपूर्ण राज्यात १५ टीम तैनात

05 Aug, 20 08:01 PM

नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे 25 ठिकाणी वृक्ष कोसळले; सीवूडमध्ये माॅल्सच्या काचाही निखळल्या

05 Aug, 20 08:00 PM

नवी मुंबई: पनवेल मधील खांदेश्वर पोलीस स्टेशन इमारतीवर वृक्ष कोसळला

05 Aug, 20 08:00 PM

पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था: अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.

05 Aug, 20 07:59 PM

मुंबईत वाऱ्याचा वेग १०६ किमी प्रतितास; कुलाबा वेधशाळेची माहिती
 

05 Aug, 20 07:58 PM

रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं सीएसएमटी-वाशी आणि सीएसएमटी-ठाणे मार्गावरील मध्य रेल्वेची सेवा ठप्प

05 Aug, 20 07:54 PM

मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाणी साचलं; रुग्णांची गैरसोय

05 Aug, 20 07:52 PM

मरीन ड्राईव्ह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

05 Aug, 20 07:47 PM

मुंबईकरांनो घरीच थांबा, अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

05 Aug, 20 07:46 PM

पावसाचा जोर पाहता मुख्यमंत्र्यांकडून मुंबई महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटउद्धव ठाकरे