Mumbai Rain Updates Live: मध्य, हार्बर वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा वाहतूक सुरू

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 06:55 AM2019-07-02T06:55:20+5:302019-07-02T16:21:19+5:30

सततच्या पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम

Mumbai Rain Maharashtra Rain Live Mumbai Railway Service updates | Mumbai Rain Updates Live: मध्य, हार्बर वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा वाहतूक सुरू

Mumbai Rain Updates Live: मध्य, हार्बर वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा वाहतूक सुरू

Next

मुंबई: रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. अनेक भागांत रेल्वे रुळांजवळ पाणी साचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. 

LIVE

Get Latest Updates

02:31 PM

पावसामुळे हवाई वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल



 

01:37 PM

साकीनाका पोलीस ठाण्यात पाणी शिरल्यानं पोलिसांचे हाल



 

01:26 PM

किंग्स सर्कलमध्ये पाणी तुंबल्यानं सर्वसामान्यांचे हाल



 

12:58 PM

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी हेल्पलाईन नंबर जारी



 

12:13 PM

नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याचा निचरा; चर्चगेट-विरार लोकलसेवा सुरू



 

11:56 AM

पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल



 

11:55 AM

ठाणे परिवहनच्या विशेष फेऱ्या; आयुक्तांचे आदेश

11:06 AM

मध्य रेल्वेकडून मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेस, दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द

10:32 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शताब्दी रुग्णालयाला भेट; मालाड दुर्घटनेच्या जखमींची केली विचारपूस

10:30 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात पोहोचले; शहरातील परिस्थितीचा घेतला आढावा

10:00 AM

'मुंबई-नांदेड-मुंबई' दोन्ही तपोवन रद्द; नंदीग्राम नाशिक येथून सुटणार

09:51 AM

चांदिवलीतील संघर्षनगरमध्ये रस्ता खचला



 

09:34 AM

पश्चिम रेल्वेची सेवा वसईपर्यंत सुरळीत



 

09:29 AM

उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाजवळ पाणीच पाणी



 

09:12 AM

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या



 

08:49 AM

मुंबई सेंट्रल एसटी स्थानकावरून अलिबाग, स्वारगेट, भिवंडीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द; फक्त लांब पल्ल्याच्या फेऱ्या फ्री वे वरून सुरू

08:41 AM

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ विभागाकडून कॉम्प्युटर सायन्सच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाची परीक्षा पुढे ढकलली

08:27 AM

मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचं आवाहन



 

08:26 AM

नालासोपारा भागात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वसई-विरार दरम्यानची वाहतूक विस्कळीत



 

08:20 AM

सायन भागात रेल्वे रुळांवर पाणी साचलं; मध्य रेल्वे ठप्प



 

08:01 AM

कुर्ला नेहरूनगर एसटी आगारात व सायनपासून पुढे पावसाचे पाणी रस्त्यावर; दादर येथून फ्री वेवरून एसटी एसटी वाहतूक सुरू

07:55 AM

सतत सुरू असलेल्या पावसामुळे हवाई सेवेवर परिणाम



 

07:32 AM

हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वाशी अप, डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद
 

07:32 AM

पश्चिम रेल्वेची बोरिवली ते वसई दरम्यानची अप, डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
 

07:32 AM

सीएसएमटी-ठाणे दरम्यानची अप, डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
 

07:29 AM

चर्चगेट-वसई दरम्यान पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत



 

07:27 AM

पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा



 

07:06 AM

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सेवेचा खोळंबा



 

07:05 AM

सततच्या पावसानं हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत



 

07:02 AM

नालासोपाऱ्यात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेकडून लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल



 

07:01 AM

नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी; रेल्वे सेवा विस्कळीत



 

06:59 AM

गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, सांताक्रूझ पावसाचा जोर ओसरला; रिमझिम पाऊस सुरूच

06:58 AM

मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील; राज्य शासनाचं आवाहन

06:57 AM

राज्य सरकारकडून सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर

06:57 AM

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर

06:56 AM

हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने
 

06:56 AM

पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने
 

06:56 AM

मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक ठप्प

Web Title: Mumbai Rain Maharashtra Rain Live Mumbai Railway Service updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.