Join us

Mumbai Rain Updates Live : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 12:46 PM

मुंबई -  मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. पावसाचा ...

08 Jul, 19 06:20 PM

मुसळधार पावसामुळे वाशीत साचले पाणी

08 Jul, 19 06:17 PM

जोरदार पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम


08 Jul, 19 05:52 PM

कोपरा पुलाखाली पाणीच पाणी

08 Jul, 19 05:43 PM

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज


08 Jul, 19 05:25 PM

लोणावळा : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा कोसळली दरड, ठाकूरवाडी ते मंकीहीलदरम्यान कोसळली दरड



 

08 Jul, 19 05:02 PM

सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचल्याने वाहन चालकांनी खारघर शहरातील अंतर्गत मार्गाचा उपयोग केल्याने बेलपाडा ते भारती विद्यापीठ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी 

08 Jul, 19 04:45 PM

उमरोली गावाचा संपर्क तुटला, गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली



 

08 Jul, 19 04:28 PM

मुसळधार पावसामुळे कल्याणमधील मलंगड परिसरातील नदीला पूर.

08 Jul, 19 04:19 PM

खारघरमधील टाटा हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले

08 Jul, 19 04:11 PM

नवी मुंबईत मुसळधार, विविध भागात साचले पाणी

08 Jul, 19 04:01 PM

बोनसरी गावात पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत



 

08 Jul, 19 03:50 PM

विलेपार्ले पूर्व मालविया रोड येथे सकाळी 11 वाजता अतिवृष्टीमुळे  मोठे झाड एका गाडीवर पडले. 

08 Jul, 19 03:37 PM

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

08 Jul, 19 03:27 PM

पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते, विमान वाहतुकीला फटका


08 Jul, 19 03:21 PM

घरांमध्ये साचलेले पाणी उपसण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत, पाणी साचलेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू

08 Jul, 19 03:14 PM

नवी मुंबई : नैसर्गिक नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, नाल्याशेजारील घरांना धोका.

08 Jul, 19 03:10 PM

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी



 

08 Jul, 19 02:58 PM

नवी मुंबई : एमआयडीसीमधील बोनसरी झोपडपट्टीमध्ये पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान, काही घरांमध्ये तीन फूट पाणी साचले आहे.

08 Jul, 19 02:51 PM

नवी मुंबईमध्ये 9 ठिकाणी पाणी साचले, दोन वृक्ष कोसळले, सकाळी साडेआठ वाजल्यापासून 1.30 पर्यंत 81 मिमी. पावसाची नोंद

08 Jul, 19 02:41 PM

नवी मुंबईत मुसळधार, विविध भागात साचले पाणी

08 Jul, 19 02:37 PM

ठाणे : तलावपाळी परिसरात साचलं पाणी

08 Jul, 19 02:30 PM

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली. फक्त 253 वाहनांची आवक. शनिवारच्या तुलनेत 50% आवक घटली.

08 Jul, 19 02:00 PM

नवी मुंबई : एमआयडीसीमध्ये मिलेनियम बिझनेस पार्क परिसरात दोन ते तीन फुट पाणी साचले. वाहतूक विस्कळीत

08 Jul, 19 01:53 PM

मुसळधार पावसाचा इशारा


08 Jul, 19 01:50 PM

पांडवकडा धबधब्याचा पाणी वाहून नेणारा नाला फुटल्याने सायन-पनवेल महामार्गावर पाणी, मोठ्या संख्येने गाड्या पाण्यात अडकल्या, पनवेल ,पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प.

08 Jul, 19 01:41 PM

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

08 Jul, 19 01:34 PM

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे बोनसरी झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले. जनजीवन विस्कळीत.

08 Jul, 19 01:31 PM

ठाणे-बेलापूर रोडवर ऐरोलीकडे जाण्याच्या मार्गावर घनसोलीजवळ सुमारे एक तासापासून वाहतूक कोंडी.

08 Jul, 19 01:26 PM

येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता 

08 Jul, 19 01:14 PM

आपले सहकार्य मोलाचे आहे - BMC


08 Jul, 19 01:06 PM

अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात 

08 Jul, 19 01:03 PM

मुंबईत मुसळधार पाऊस; अंधेरी सबवेत पाणी साचलं


08 Jul, 19 01:00 PM

मध्य रेल्वेवरील लोकलदेखील 15 ते 20 मिनिटे तर हार्बर 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. 

08 Jul, 19 12:56 PM

शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता



 

08 Jul, 19 12:53 PM

अंधेरीच्या महाल इंडस्ट्रियल परिसरात भिंत कोसळली.

08 Jul, 19 12:52 PM

पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.


08 Jul, 19 12:50 PM

वांद्रे कलानगर, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, परेल, असल्फा या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. 

08 Jul, 19 12:49 PM

जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणं 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहेत. तर काही उड्डाणे वळवण्यात आली आहेत.


08 Jul, 19 12:49 PM

पावसाचा फटका रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. 

08 Jul, 19 12:48 PM

पावसाचा फटका रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. 

08 Jul, 19 12:48 PM

 दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई ट्रेन अपडेटपाऊसमहाराष्ट्रठाणे