Join us

Mumbai Rain : 'दरवर्षी मुंबई तुंबते... 3 पिढ्यांपासून बीएमसी चालवणारे ठाकरे कुटुंब फेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 6:21 PM

रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, त्यांनंतर आज पुन्हा दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये काहीजण मृत्यूमुखी पडले आहेत.

ठळक मुद्देरौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, त्यांनंतर आज पुन्हा दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये काहीजण मृत्यूमुखी पडले आहे

मुंबई - राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. दरड कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या असून 24 तासांत जवळपास 37 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यावरुन, भाजपा नेते आक्रम झाले असतानाच आता खासदार नवनीत कौर यांनीही बीएमसीच्या कारभारावरुन शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, त्यांनंतर आज पुन्हा दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये काहीजण मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबईतील या विदारक पूरस्थितीवर खासदार नवनीत कौर यांनी भाष्य केलंय. 

पावसामुळे महाराष्ट्राची विशेषत: मुंबईची देशात बदनामी होत आहे, विविध राज्यांतील माध्यमांचे प्रतिनिधी मुंबईत येऊन येथील ड्रेनेजवर भाष्य करत आहेत. ज्या बीएमसीमध्ये गेल्या 3 पिढ्यांपासून ठाकरेंच राज्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला फंड एकीकडे आणि बीएमसीला मिळणारा फंड एकीकडे आहे. दरवर्षी मुंबईत दोन दिवसांच्या पावसानंतर रस्ते बंद होतात, रेल्वे ट्रॅक बंद होतात, दुर्घटना घडतात, वातावरण थांबून जाते, असे म्हणत खासदार कौर यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी बीएमसीचे लोकं कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईसाठी खर्च करतात. बीएमसीच्या खर्चाबाबत थर्डपार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यासाठी, केंदाने संसदीय समिती नेमण्याची गरज आहे. त्यावेळीच, बीएमसीकडून किती रुपये खर्च केला जातो, हे जनतेसमोर येईल. त्यामुळे, मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय समितीकडे याबाबत मागणी करत असल्याचं नवीनीत कौर यांनी म्हटलं आहे. नवनीत कौर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, संसदीय समितीकडे मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. 

मुंबईला धोक्याचा इशारा - शेलार

आमदार अँड आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर सविस्तर भाष्य केले. मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडुपरच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरले. २६ जुलैच्या पावसातही भांडुप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असेही अॅड शेलार म्हणाले. 

टॅग्स :मुंबईनवनीत कौर राणामुंबई महानगरपालिकापाऊस