Mumbai Rain Updates : सलग कोसळलेल्या मान्सूनची सोमवार अखेर विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:47 PM2020-07-06T12:47:58+5:302020-07-06T12:58:29+5:30

मुंबई धो धो पाऊस पडल्याने येथील नोंदीचे प्रमाण वाढले आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या पावसाची नोंद पाहिली असता या काळात मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते.

Mumbai rain update: Over 100 mm rain in suburban Mumbai | Mumbai Rain Updates : सलग कोसळलेल्या मान्सूनची सोमवार अखेर विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंद

Mumbai Rain Updates : सलग कोसळलेल्या मान्सूनची सोमवार अखेर विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंद

googlenewsNext

मुंबई - सलग ३ दिवस कोसळलेल्या पावसाने आज अखेर म्हणजे सोमवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार विश्रांती घेतली. सोमवारी सकाळपासून पाऊस मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांतीवर होता. कुठे तरी अधून-मधून कोसळणारी सर वगळता बहुतांश ठिकाणी किंचित का होईना सुर्यनारायणाचे दर्शन होत होते. असे असले तरी रविवारी दिवसासह रात्री कोसळलेल्या पावसाची सोमवारी सकाळी ८.३० वाजता तब्बल ११६.१ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई धो धो पाऊस पडल्याने येथील नोंदीचे प्रमाण वाढले आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या पावसाची नोंद पाहिली असता या काळात मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात यावेळी ३९१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस १३० टक्के आहे. मुंबईच्या उपनगराचा विचार करता येथे १ ते ५ जुलै या काळात सर्वसाधारण १७६.६ मिलीमीटर  पावसाची नोंद होते. आता ३८५.१ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. हा पाऊस ११९ टक्के एवढा आहे.

सोमवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. कुठे तरी एखादी सर कोसळत होती. बहुतांश ठिकाणी ऊन पडले होते. पावसामुळे पडझडीच्या घटना घडत असतानाच सहा ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. ८९ ठिकाणी झाडे कोसळली. ३१ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. भांडूप संकुल येथे विहार तलावात एक मुलगा पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलासह पोलीसांतर्फे त्याचा शोध सुरू करण्यात आला. नौदलच्या पाणबुड्यांनादेखील घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. ऊशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारीही विश्रांती घेतली होती.

६ जुलैपर्यंतचा पाऊस मिमीत.
कुलाबा ९२८
सांताक्रूझ ८९६.२

वार्षिक सरासरी मिमीत
कुलाबा २२९२
सांताक्रूझ २६६८

२०२० पावसाची टक्केवारी
कुलाबा ४०.४८
सांताक्रूझ ३३.५९

गेल्या २४ तासांत मनपाच्या स्वयंचलित केंद्रावरील पाऊस मिमीत.
शहर २८.४२
पूर्व उपनगर ८५.६०
पश्चिम उपनगर ७७.९२

१ ते ५ जुलैपर्यंतचा पाऊस टक्कयांत
पालघर : उणे ११ टक्के
ठाणे : ४२ टक्के
रायगड : २४ टक्के

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल अन्...

"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल

"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"

भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : बापरे! वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या ज्वेलरचा कोरोनाने मृत्यू, 100 जणांचा जीव धोक्यात

CoronaVirus News : परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

 

Web Title: Mumbai rain update: Over 100 mm rain in suburban Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.