Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, वाहतूक उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 10:52 AM2019-07-27T10:52:00+5:302019-07-27T14:09:12+5:30

ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. शनिवारी (27 जुलै) मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे.

mumbai rain update trains delayed heavy overnight rain mumbai thane floods tracks | Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, वाहतूक उशिराने

Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, वाहतूक उशिराने

googlenewsNext
ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची कल्याण-कुर्ला वाहतूक सुरू असली तरीही जलद मार्गावर लोकलचा अभाव असलेला पाहायला मिळत आहे.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. शनिवारी (27 जुलै) मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची कल्याण-कुर्ला वाहतूक सुरू असली तरीही जलद मार्गावर लोकलचा अभाव असलेला पाहायला मिळत आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. धीम्या मार्गावरील लोकल सेवा अप डाऊन मार्गावर सुरू आहे. 

मुंबई आणि ठाण्यात शुक्रवारी (26 जुलै) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. लोकलमधून प्रवास करताना जीव सांभाळा असे आवाहन लोहमार्ग पोलीस करत आहेत. बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरक्षित ठिकाणी उभी असून प्रवाशांनी ट्रेनमधून उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. एक्स्प्रेस जवळ चार ते पाच फूट पाणी साचल्याने ही एक्सप्रेस काजगाव जवळील रेल्वे रुळावर उभी करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. तसेच प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. माटुंगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात पाऊस सुरू आहे. पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. 

मुसळधार पावसामुळे अंबरानाथमधील ऐतिहासिक शिवमंदिर परिसर जलमय झाला आहे. शिवमंदिरातही पाणी शिरले आहे. पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस पनवेल स्थानकात थांबवण्यात आली आहे. तसेच 27 जुलै रोजी सुटणारी पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि 29 जुलै रोजी सुटणारी एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका, सात विमाने रद्द, 8 ते 9 विमानांचा मार्ग बदलला आहे. गेल्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात 150 ते 180 मिमी पाऊस झाला असून दिवसभरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

 

Web Title: mumbai rain update trains delayed heavy overnight rain mumbai thane floods tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.