Join us

Mumbai Rain Updates: मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील ४ दिवस अतिवृष्टीचे, हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 11:26 AM

Mumbai Mansoon Updates: धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागात लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीच्या काळात आवश्यक तेथे NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.यंदा पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसविले आहेत. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंता स्पॉटवर राहतील. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी

मुंबई – बंगालच्या खाडीत येत्या आठवड्यात नैसर्गित हालचाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बंगालच्या उत्तरी भागात कमी दबावाचा पट्टा निर्माण होऊ शकतो असं हवामान खात्याने सांगितले आहे. त्याचा थेट परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि झारखंड याठिकाणी होऊ शकतो. तर मध्य प्रदेशातही वादळीवाऱ्याचा फटका बसू शकतो. ज्याचा परिणाम मराठवाडा, तेलंगाणा आणि तामिळनाडूत दिसू शकतो.

हवामान खात्याने महाराष्ट्रात मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासून बोरिवली, कांदिवली, नालासोपारा, वसई या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील स्थानिक हवामान खात्याने पुढील ५ दिवस हवामानात बदल होण्याचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १० जूनपासून मान्सूनला सुरूवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील मान्सून स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्याच आदेश प्रशासनाला दिले आहेत.

राज्य प्रशासनाने सखल भाग, भूस्खलन होणाऱ्या जागा आणि किनारपट्टीजवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीच्या काळात आवश्यक तेथे NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागात लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

महापालिका सज्ज

आयुक्त इकबालसिंह चहल  बैठकीत म्हणाले की, यंदा पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसविले आहेत. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंता स्पॉटवर राहतील. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून, यात साचलेले पाणी वळते करून साठविण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील अडचणी निर्माण झाल्यास धावून जाईल. प्रत्येक वॉर्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून, गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल.

मुंबईच्या सायन परिसरातही जोराच्या पावसानं रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर रविवारी रात्री मुंबईच्या वांद्रे येथील बहरामबाग परिसरात ४ मजली इमारतीचा काही भाग कोसळला होता.या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. रात्री २ च्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई महानगरपालिका