मुंबई: रात्रभर मुंबईला झोडपल्यानंतरही पावसाचा जोर कायम आहे. याचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. मध्य आणि हार्बरवरील लोकलदेखील 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. मुंबईसह कोकणात पुढील पाच दिवसांमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. दिवस उजाडल्यावरही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रात्रभर झालेल्या पावसानं नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे विरारहून सुटणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावला आहे. मध्य रेल्वेलादेखील पावसाचा फटका बसला आहे. सायन, माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरला पावसानं चांगलंच झोडपलं आहे. Rain Live Updates:
- मुंबईत सर्वच ठिकाणी पाऊस नाही, मुख्याध्यापकांना 3 सुट्ट्या देण्याचा अधिकार, मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.- विनोद तावडे
- मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल रद्द
- ठाणे पश्चिमेकडील राबोडी परिसरात भिंत कोसळली, सहा वाहनांचं नुकसान
- नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली; बोरिवली ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प
- आज डबेवाल्यांची सेवा बंद राहणार
- बोरिवली-चर्चगेट लोकल गाड्या 15 मिनिटं उशिरानं
-
- पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिरानं- बोरिवली ते विरार वाहतूक ठप्प- विरार-चर्चगेट गाड्या 15 मिनिटं उशिरानं- विरारहून सुटणाऱ्या लोकल 15 मिनिटं उशिरानं; विरारच्या फलाट क्रमांक 1 आणि 2 वरुन धीम्या गतीनं वाहतूक सुरू- मध्य, हार्बरच्या गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं