Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 09:15 AM2020-08-05T09:15:58+5:302020-08-05T09:19:28+5:30
Mumbai Rain Updates : दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.
मुंबई - मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवार दुपारपर्यंत झोडपून काढले. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. भांडूप, घाटकोपर, ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मुंबई आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Normal life disrupted in Mumbai as heavy rainfall triggers water logging at various places in the city.
— ANI (@ANI) August 5, 2020
IMD, Mumbai has predicted heavy downpour for today.
Visuals from Sion King Circle #Maharashtrapic.twitter.com/yq45ytPqEy
मुंबई, ठाणे, रायगडला अतिवृष्टीचा इशारा
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून बुधवारीही मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान शास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव म्हणून अरबी समुद्रावर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याची गती वाढली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणेसह कोकणात बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होईल.
मंगळवारी सांताक्रुझ-वाकोला येथे नाल्यात घर कोसळून दोघींचा मृत्यू झाला. दुसरीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवली येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी साडेसहाला घडलेल्या या घटनेनंतर येथील वाहतूक संध्याकाळी सहाच्या सुमारास जवळपास बारा तासांनी हळूहळू पूर्वपदावर आली. मुसळधार पावसामुळे सांताक्रुझ वाकोला येथील धोबीघाटमधील घरांचे बांधकाम मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लगतच्या नाल्यात कोसळले. या दुर्घटनेत जान्हवी मिलिंद काकडे या दीड वर्षांच्या मुलीसह रेखा काकडे (26) यांचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"
CoronaVirus News : लय भारी! फक्त 30 सेकंदांत आवाजावरून समजणार कोरोना आहे की नाही?, जाणून घ्या कसं
CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा