Mumbai Rain Updates: मुसळधार! मुंबई, ठाण्यात गेल्या दोन तासांपासून पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा सध्या सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 11:43 IST2022-08-16T11:41:59+5:302022-08-16T11:43:16+5:30
मुंबई शहर आणि उपनगरसह ठाणे परिसरात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरींनी शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे.

Mumbai Rain Updates: मुसळधार! मुंबई, ठाण्यात गेल्या दोन तासांपासून पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा सध्या सुरळीत
मुंबई-
मुंबई शहर आणि उपनगरसह ठाणे परिसरात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरींनी शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. गेल्या दोन तासांपासून मुंबईत शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू होती. पण आज पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे.
मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा सध्या सुरळीत असून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सुरळीत सुरू आहे. पण पावसाचा जोर असाच राहिला तर लोकल सेवेवर परिणाम होऊ शकतो. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अधूनमधून तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या समुद्रात दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी ४.३९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. याच वेळेत पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल आणि नायर रुग्णालय परिसरात १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मालवणी परिसरात २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.