Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! हवामान खात्याकडून रेडअलर्ट जारी; पुढील ३-४ तास धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:20 PM2021-07-21T14:20:29+5:302021-07-21T14:21:22+5:30

Mumbai Rain Updates: मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागानं दिला आहे.

Mumbai Rain Updates red alert from the weather department kokan and madhya maharashtra heavy rain | Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! हवामान खात्याकडून रेडअलर्ट जारी; पुढील ३-४ तास धोक्याचे

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! हवामान खात्याकडून रेडअलर्ट जारी; पुढील ३-४ तास धोक्याचे

googlenewsNext

Mumbai Rain Updates: मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागानं दिला आहे. मुंबई शहरासह उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. (Mumbai Rain Updates red alert from the weather department kokan and madhya maharashtra heavy rain)

मुंबईला पुढील तीन ते चार तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट राहणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस मुंबईकरांसाठी पावसाचे ठरणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

"कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्टात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच मराठवाड्यातही चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. येत्या ४८ तासांसाठी कोकणामध्ये रेडअलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याच्या परिसरातही रेड अलर्ट असणार आहे. तर मुंबईत उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट असणार आहे. पुढे ऑरेंज अलर्ट असणार आहे", अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे. 

Read in English

Web Title: Mumbai Rain Updates red alert from the weather department kokan and madhya maharashtra heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.