Mumbai Rains Updates: मुंबईच्या समुद्रात ३.८७ मी. उंचीच्या लाटा, हायटाइड; हवाई वाहतुकीवर परिणाम, लोकल सेवा उशीराने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 03:38 PM2024-07-12T15:38:23+5:302024-07-12T15:48:25+5:30

Mumbai rains LIVE Updates: मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यात मुंबई हवामान विभागाकडून आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai rains 3 87 metre high tide in next few hours flights affected trains delayed after heavy showers | Mumbai Rains Updates: मुंबईच्या समुद्रात ३.८७ मी. उंचीच्या लाटा, हायटाइड; हवाई वाहतुकीवर परिणाम, लोकल सेवा उशीराने

Mumbai Rains Updates: मुंबईच्या समुद्रात ३.८७ मी. उंचीच्या लाटा, हायटाइड; हवाई वाहतुकीवर परिणाम, लोकल सेवा उशीराने

मुंबई

मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यात मुंबई हवामान विभागाकडून आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या समुद्रात आज दुपारी ४ वाजून ०६ मिनिटांनी ३.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. याच कालावधीत पावसाचं प्रमाण अधिक राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. 

पावसाची रिपरिप सुरूच असल्यानं हवाई वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावरुन अनेक उड्डाणं रद्द झाली आहेत. तर मुंबईकरांची लाइफ लाइन असलेली लोकल सेवा देखील उशीराने सुरू आहे. 

माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येत आहेत. त्यात पाऊस सुरु असल्यानं वाहतूक धीमी झाली आहे. हवामान खात्यानं मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

मुंबईत आज सकाळी मुसळधार पावसामुळे किंग्ज सर्कल, एपीएमसी मार्केट, तुर्भे परिसरात पाणी साचलं होतं. तसंच मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ जवळ देखील रस्त्यावर पाण्याचं साम्राज्य होतं.

Web Title: Mumbai rains 3 87 metre high tide in next few hours flights affected trains delayed after heavy showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.