Mumbai Rains: मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, मुंबईतील आपत्तीचा घेणार आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 06:03 PM2021-07-18T18:03:20+5:302021-07-18T18:03:44+5:30
Mumbai Rain Updates: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Mumbai Rains Updates: मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावासाच्या हाहाकारामुळे विविध ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू; विक्रोळीत 7, तर भांडूपमध्येही एक दगावला
मुंबईत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चर्चा करणार असून मुख्यमंत्री ठाकरे काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत पावसाचं थैमान! कुठं लॅंडस्लाईड, कुठं भिंत कोसळली, तर कुठं झाडांची पडझड; पाहा फोटो
मुंबईत विविध ठिकाणच्या घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू
मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यात मुंबईतील पश्चिम आणि उपनगरांमध्ये पाणी साचलं. तर चेंबुरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळली. यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळीतही अशाच प्रकारची घटना घडली. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. भांडूपमध्येही दरड कोसळून एका १६ वर्षीय मुलाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.