Mumbai Chembur Landslide : चेंबूर, विक्रोळीत 17 जणांचा मृत्यू; "लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण..."; दुर्घटनेवर महापौरांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 11:39 AM2021-07-18T11:39:26+5:302021-07-18T11:50:40+5:30
Mumbai Rains: Landslide wall collapse in chembur And Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनांवर महापालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली आहे.
मुंबई - चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे आणि भांडूप भागातही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Naredra Modi) दुःख व्यक्त केले असून मदतीची घोषणा केली आहे. 'मुंबईतीलचेंबूर आणि विक्रोळीमध्ये भिंत कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाल्याने दुःखी आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबासोबत आहेत. यात जे लोक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.' यावेळी त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा केली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या घटनांवर महापालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली आहे. "महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्याठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं" अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to wall collapses in Mumbai. Rs. 50,000 would be given to those injured.
— PMO India (@PMOIndia) July 18, 2021
"पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तुम्ही पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. इतर ठिकाणीही लोकांना दरवर्षी दुसरीकडे स्थलांतरीत केलं जातं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. घडलेली घटना क्लेशदायक आहे पण नागरिकांना हेच आवाहन आहे की लोकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे" असं देखील महापौरांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे.
चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे. #rainfallinmumbai#chemburlandslide#landslide#chemburhttps://t.co/p1g9BZ2Djc
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2021
मुंबईमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 5 ते 6 लोक यात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडूप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागाला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.
Maharashtra | 11 people killed after a wall collapse on some shanties in Chembur's Bharat Nagar area due to a landslide, says National Disaster Response Force (NDRF)
— ANI (@ANI) July 18, 2021
Rescue operation is underway. pic.twitter.com/W24NJFWThU